राज्य सरकारने ऊस दर नियंत्रण मंडळावरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. त्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढा देणारे माजी खासदार राजू शेट्टी, शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासारख्या नेत्यांना वगळण्यात आले आहे.
यामुळे त्यांच्यासह शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. सरकारकडून ऊस दर नियंत्रण मंडळाची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये अशासकीय आणि शासकीय अशा पद्धतीने या मंडळावरून नियुक्त्या केल्या जात होत्या.
मागच्या अनेक वर्षांपासून ऊस दराच्या मुद्दावरून माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह अन्य शेतकरी नेत्यांनी ऊस दरासाठी अनेकदा आंदोलने केली आहेत. सत्तातरानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये ऊस दर नियंत्रण मंडळावरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या होत्या.
तुमच्या बागेत ही पाच झाडे लावा, तुमच्या घराची हवा पूर्णपणे करतील स्वच्छ
या मंडळावरील नियुक्त्या करण्याबाबत राजू शेट्टी यांच्यासह काही शेतकरी नेत्यांनी पाठपुरावा केला होता. परंतु आता या नियुक्त्यांमध्ये एकही शेतकरी नेता नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
यावर्षी खूपच कमी पावसाची नोंद, कोयना धरण १०० टक्के भरण्याची शक्यता कमीच...
यामध्ये आता शेतकरी प्रतिनिधी म्हणून सुहास पाटील, सचिनकुमार नलवडे, पृथ्वीराज जाचक, धनंजय भोसले, योगेश बर्डे, यांचा समावेश या मंडळावर करण्यात आला आहे. दरम्यान, कारखानदारांना लाभ व्हावा म्हणून हे मंडळ कमकुवत करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला.
लासलगावमध्ये डाळिंब प्रतिक्रेट २०११ रुपये भाव, शेतकऱ्यांना दिलासा..
गोकुळचा चिठ्ठीवरचा कारभार कधी बंद होणार? दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसतोय फटका...
ज्वारीला बारामतीत मिळाला प्रति क्विंटल ६०५१ रुपये दर, उच्चांकी दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा...
Share your comments