MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

वावर आणि चांगले पाणी दिसले की तुम्ही कांडेच लावतात, दुसऱ्या पिकाचा देखील विचार करायला हवा-मा. शरद पवार

यावर्षी आपण पाहत आहोत की, साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला तरीदेखील बर्याचशा प्रमाणात ऊस शेतामध्ये उभा आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
extra canecrop problem create in maharashtra

extra canecrop problem create in maharashtra

यावर्षी आपण पाहत आहोत की, साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला तरीदेखील बर्‍याचशा प्रमाणात ऊस शेतामध्ये उभा आहे.

बऱ्याच प्रमाणात उसाला तुरे फुटली असून वजनात घट होण्याची भीती आहे.  अतिरिक्त उसाचा प्रश्न हा प्रामुख्याने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जास्त करून आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे लागवड क्षेत्रात झालेली प्रचंड वाढ होय. पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने तसेच दोन पैसे खात्रीने मिळतील या मानसिकतेने उसाच्या पिकाकडे पाहिले जाते. त्यामुळे उसाच्या क्षेत्रात प्रचंड वाढ झाली. एक खात्रीचे नगदी आणि पैसे देणारे पीक म्हणून आपण उसाचा विचार करतो परंतु आत्ता त्याला दुसरा विचार करावा लागेल असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. शिराळा येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांनी आपले विचार मांडले.

नक्की वाचा:सरकारला आली आठवण! 2018 मधील चारा छावण्यांच्या अनुदान वाटपाला अखेर मुहूर्त सापडला

काय म्हणाले पवार?

 या वर्षी ऊस लागवड क्षेत्रात इतकी वाढ झाली आहे की गाळप कसे करायचे हा एक मोठा प्रश्न आहे.  मी सहकार मंत्र्यांना सारखा विचारत असतो की अजून कारखाने किती दिवस चालणार? शंभर टक्के उसाचे गाळप होईल की नाही? पुढे ते म्हणाले की नुकतेच सहकारमंत्र्यांनी मला समस्त राज्याचा आढावा दिला. या आढाव यावरून असे दिसते की जवळपास 90 पेक्षा हून अधिक कारखाने जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चालतील अशी स्थिती सध्या आहे. पाणी आणि वावर दिसले की तुम्ही कांडे लावल्या शिवाय राहत नाही, दुसऱ्या कुठल्याही पिकाचा विचार करत नाही. परंतु आता दुसरा काहीतरी विचार करावा लागेल. नुसते साखर एके साखर करताना दुसरा विचार करावा लागेल. पुढे बोलताना ते म्हणाले की मला आनंद आहे की मानसिंगराव नाईक यांनीयेथील कारखान्याच्या माध्यमातून इथेनॉल निर्मितीचा निर्णय घेतला.

आज आपण ब्राझील आणि अमेरिकेसारख्या देशांचा विचार केला तर या देशांमध्ये पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण केले जाते व या इंधनावर वाहने चालवली जातात. त्यामुळे सदरील देशांचं हे परकीय चलन वाचत. आपल्यालाही या पद्धतीचा विचार करावा लागेल असा विश्वास शरद पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला.

नक्की वाचा:लेकीचे जन्मानंतर हेलिकॉप्टरने ग्रँड वेलकम! लेकीच्या जन्मानंतर असही स्वागत, खरच अभिमान वाटावा असेच

 साखरेच्या बद्दल पवार हे म्हणाले….

 नुसतेच साखर उत्पादनावर समाधान मानणे हे चुकीचे आहे. आज तुम्ही साखर तयार करतात व वर्षभर गोडाऊनमध्ये ठेवतात. 

गोडाउन मध्ये ठेवलेल्या त्या साखर वर कर्ज घेता व ते कर्ज घेऊन शेतकऱ्यांना भाव देतात आणि त्याच्या उसाची किंमत दिल्यानंतर वर्ष दिड वर्षांनी ती साखर विकतात. घेतलेल्या कर्जाचे व्याज हे तुमच्या डोक्यावर येते आणि त्याचा परिणाम तुमच्या किमतीवर होतो आणि यासाठी वेगळा विचार करावा लागेल की अन्य पदार्थ कुठले तयार करता येतील याचा विचार होणे फार गरजेचे आहे. असे देखील पवार यांनी म्हटले.

English Summary: farmer give prefrence to cane crop cultivation so problem create of extra cane crop Published on: 06 April 2022, 01:46 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters