1. बातम्या

सरकारला आली आठवण! 2018 मधील चारा छावण्यांच्या अनुदान वाटपाला अखेर मुहूर्त सापडला

सन 2018 यावर्षी अवर्षणाची स्थिती निर्माण होऊन भीषण दुष्काळ पडला होता. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न हा प्रचंड प्रमाणात उग्र स्वरूप धारण करून उभा राहिला होता.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
fund disburse for chara chavni in 2018 in aurangabad and beed

fund disburse for chara chavni in 2018 in aurangabad and beed

सन 2018 यावर्षी अवर्षणाची स्थिती निर्माण होऊन भीषण दुष्काळ पडला होता. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न हा प्रचंड प्रमाणात उग्र स्वरूप धारण करून उभा राहिला होता.

त्यासाठी शासनाने अनुदान स्वरूपात चारा छावण्या उभ्या केल्या होत्या. परंतु  2018 मधील या उभारलेल्या चारा छावण्यांच्या  थकित अनुदानापोटी अजूनही निधी देण्यात आला नव्हता. परंतु याला आता मुहूर्त सापडला असून सरकारने चारा छावण्यांच्या थकीत अनुदानासाठी सतरा कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यास मान्यता दिली आहे. यामधील सात लाख 82 हजार रुपये औरंगाबाद जिल्ह्यासाठी तर 66 लाख बीड जिल्ह्यासाठी वितरित करण्यात येणार आहेत.

नक्की वाचा:लेकीचे जन्मानंतर हेलिकॉप्टरने ग्रँड वेलकम! लेकीच्या जन्मानंतर असही स्वागत, खरच अभिमान वाटावा असेच

2018 मधील परिस्थिती

 सन दोन हजार अठरा च्या खरीप हंगामामध्ये मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये खूपच कमी पाऊस झाला होता.

पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा सुद्धा कमी होते. त्यामुळे 26 जिल्ह्यातील 151 तालुक्यांमध्ये आणि 268 महसुली मंडळांमधील 931 गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे या भागात जानेवारी 2019 मध्ये जनावरांसाठी चारा आणि पाणी उपलब्ध व्हावे यासाठी चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात असा आशयाचा  निर्णय घेतला गेला होता. या छावण्या उभ्या करण्यासाठी सरकारी अनुदान मंजूर केले होते. परंतु औरंगाबाद विभागामध्ये मंजूर झालेले अनुदान पेक्षा जास्त खर्च झाला होता तर बीड जिल्ह्यासाठी लेखा परिक्षणाच्या अधीन राहून राखीव अनुदान वितरित केले नव्हते.

नक्की वाचा:मुख्यमंत्री बागवानी बिमायोजना पोर्टल सुरू केले या राज्य सरकारने; पिकांचे नुकसान झाल्यावर 40 हजार रुपयांची नुकसान भरपाई

आता यामध्ये औरंगाबाद साठी चारा, पाणी, औषधे आणि छावणी पर्यंतच्या पुरवठ्यासाठी मे, जून 2019 मधील अतिरिक्त खर्च म्हणून औरंगाबाद जिल्ह्याला सात लाख 82 हजार 702 रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे. तसेच 2020 मधील ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या खर्चासाठी बीड जिल्ह्याला 17 कोटी 66 लाख 81 हजार 376 रुपयांचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

English Summary: goverment aprrovel to disburse fund of grass camp in 2018 drought in aurangabad and beed Published on: 06 April 2022, 11:21 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters