1. बातम्या

22 जुलैला होतील संसदेसमोर किसान आंदोलकांची निदर्शने

KJ Maharashtra
KJ Maharashtra
farmer demonstration

farmer demonstration

 केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात मागील काही महिन्यांपासून दिल्लीच्या  सीमेवर  शेतकरी आंदोलन करीत आहेत. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यानें विरोधात प्रचंड प्रमाणात विरोध होत आहे. त्याचाच भाग म्हणून येत्या 22 जुलैला संसदेसमोर किसान आंदोलक निदर्शने करणार आहेत.

अशी माहिती भारतीय किसान युनियनचे राकेश टिकेत यांनी दिली आहे. याबाबत एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेड दरम्यान लाल किल्ल्याच्या परिसरात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

 या सगळ्यांनी निदर्शन  आंदोलनाबाबत नियोजन करण्यासाठी बुधवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकी नंतर टिकैत म्हणाले की, संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलै रोजी होणार असून 13 ऑगस्ट पर्यंत सुरू होणार आहे. त्या दरम्यान 22 जुलै रोजी शेतकरी संसदेसमोर शांततेत निदर्शने करतील. यासाठी जवळ जवळ दोनशे शेतकरी बसचे तिकीट काढून संसद परिसरात जातील निदर्शन आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी आमची बैठक झाली.

 मागच्या 26 जानेवारी 2021 रोजी आयोजित ट्रॅक्टर रॅली च्या दरम्यान लाल किल्ला, राजपथ आणि दिल्लीच्या विविध ठिकाणी हिंसाचार झाला होता. तसेच दिल्लीच्या लाल किल्ल्यावर ध्वज फडकवण्याचा प्रयत्न झाला होता त्या पार्श्वभूमीवर या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

 

केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात  मागच्या वर्षीच्या 26 नोव्हेंबर 2020 पासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. या कायद्यांच्या बाबतीत केंद्र सरकारचे प्रतिनिधी आणि शेतकरी नेते यामध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. परंतु त्यामधून काही निष्पन्न झाले नाही. तसेच मागे काही दिवसांपूर्वी टिकेत आगामी निवडणूक शेतकरी नेते लढवू शकतात, असे सांगून केंद्र सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters