सध्या अफू शेतीचे बरीच प्रकरणे महाराष्ट्रात उघडकीस येत आहे. मागे इंदापूर तालुक्यातील आणि आणि जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वाळकी येथील प्रकरण ताजे असताना आता नाशिक जिल्ह्यातील फुलेनगर येथे अफु लागवडीचा प्रकार समोर आला आहे.
याबाबतचे सविस्तर माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील फुलेनगर( माळवाडी) येथील एका शेतकऱ्याला अफू लागवडीच्या गुन्ह्याखाली पोलीस आणि महसूल विभागाचे एकत्रित कारवाई करत दोन लाख सात हजार रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली.
माळवाडी शिवारात असलेल्या गट नंबर 405 या क्षेत्रामध्ये अफूची शेती करण्यात येत असल्याची गुप्त माहिती वावी चे पोलीस निरीक्षक कोते यांना मिळाली होती. त्यानंतर कोते यांनी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधत त्याबाबत माहिती दिली.
त्यानंतर नाशिक जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे व उपाधिक्षक सोमनाथ तांबे यांच्या आदेशानुसार मुसळगाव चे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, नायब तहसीलदार सागर मुंदडा यांनी संयुक्तपणे छापा टाकला व संबंधितांवर कारवाई केली.
या संशयित शेतकऱ्याचे नाव विलास अत्रे असून त्याने मका पिकाचे आडोशाला अफूची लागवड केलेली होती. हे अफूचे पीक आता दोन ते अडीच फूट उंच वाढले होते व या पिकाला गोलाकार बोंडे व पांढऱ्या रंगाची फुले देखील आलेली होती.
या कारवाईमध्ये पोलिसांनी चौदा गोण्या जप्त केले असून त्यांचे एकत्रित वजन 130 किलो आहे. याचा एकंदरीत किमतीचा अंदाजे विचार केला तर दोन लाख 60 हजार रुपये इतकी आहे. त्यानंतर संबंधित संशयित शेतकऱ्यावर अमली पदार्थाचे उत्पादन घेतले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Share your comments