1. बातम्या

खरं काय! अल्पभूधारक शेतकरी व भूमिहीन मजुरांना शेतजमीन विकत घेण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया देणार कर्ज

भारत एक कृषिप्रधान देश आहे, देशात सर्वात जास्त अल्पभूधारक शेतकरी बांधव शेती करत असतात तसेच भूमिहीन मजूर देखील मोठ्या प्रमाणात शेती काम करतात. भारत सरकार अशा कष्टकरी अल्पभूधारक शेतकरी व भूमिहीन मजुरांसाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवित आहे. अल्पभूधारक शेतकरी व शेतमजुरांचे जीवनमान उंचविण्यासाठी आता भारतीय स्टेट बँकने एक मोठं पाऊल उचललं आहे. देशातील तसेच राज्यातील अनेक भूमिहीन शेतमजुरांचे स्वतःची शेतजमीन असावी असे स्वप्न असते मात्र शेतजमीन विकत घेण्यासाठी अमाप पैसे आवश्यक असतात.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
farmer

farmer

भारत एक कृषिप्रधान देश आहे, देशात सर्वात जास्त अल्पभूधारक शेतकरी बांधव शेती करत असतात तसेच भूमिहीन मजूर देखील मोठ्या प्रमाणात शेती काम करतात. भारत सरकार अशा कष्टकरी अल्पभूधारक शेतकरी व भूमिहीन मजुरांसाठी अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवित आहे. अल्पभूधारक शेतकरी व शेतमजुरांचे जीवनमान उंचविण्यासाठी आता भारतीय स्टेट बँकने एक मोठं पाऊल उचललं आहे. देशातील तसेच राज्यातील अनेक भूमिहीन शेतमजुरांचे स्वतःची शेतजमीन असावी असे स्वप्न असते मात्र शेतजमीन विकत घेण्यासाठी अमाप पैसे आवश्यक असतात.

त्यामुळे केवळ पैशांअभावी इच्छा असताना देखील शेतमजूर तसेच अल्पभूधारक शेतकरी शेत जमीन विकत घेऊ शकत नाही. केवळ मजुरी व अत्यल्प शेत जमिनीतून अल्पभूधारक शेतकरी व भूमिहीन शेतमजूर यांचा विकास होणे निव्वळ अशक्य आहे, त्यासाठी  या वर्गाचे जीवनमान उंचावले जावे आणि त्यांना उत्पन्नाचे अतिरिक्त साधन व्हावे या उदात्त हेतूने स्टेट बँक ऑफ इंडियाने एक भन्नाट योजना आणली आहे. अलीकडे देशातील सरकार आणि विविध बँका भूमिहीन शेतमजुरांसाठी तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या कर्जाच्या योजना अमलात आणत आहेत, स्टेट बँक ऑफ इंडियाने या पुढे एक पाऊल टाकले असून, आता स्टेट बँक ऑफ इंडिया अल्पभूधारक शेतकरी व भूमिहीन मजुरांना शेत जमीन विकत घेता यावी म्हणून कर्ज उपलब्ध करून देणार आहे. जर आपणही अल्पभूधारक शेतकरी तसेच शेतमजूर असाल आणि आपणास शेत जमीन घेण्याची इच्छा असेल मात्र शेत जमीन घेण्यासाठी लागणारा पैसा आपल्याकडे उपलब्ध नसेल तर चिंता करू नका स्टेट बँक ऑफ इंडिया आता लँड परचेस स्कीम या त्यांच्या महत्त्वाकांक्षी योजनेतून शेतजमीन विकत घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणार आहे.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की स्टेट बँक ऑफ इंडियाची परचेस स्कीम अल्पभूधारक शेतकरी व शेतमजुरांना शेतजमीन विकत घेण्यासाठी मदत करते. स्टेट बँक ऑफ इंडिया या योजनेद्वारे पात्र लोकांना जवळपास 85 टक्के मदत शेत जमीन घेण्यासाठी करत असते. या योजने अंतर्गत कर्ज घेण्यासाठी जी शेतजमीन विकत घ्यायची असेल त्या शेत जमिनीचे बँकेद्वारे मूल्यांकन केले जाते. याच्या आधारावर पात्र व्यक्तींना 85 टक्के पर्यंत कर्ज बँकेद्वारे पुरवले जाते आणि जोपर्यंत कर्जाची परतफेड होत नाही तोपर्यंत विकत घेतलेली शेत जमीन बँकेकडे गहाण ठेवली जाते. या योजनेअंतर्गत घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी जवळपास सात ते दहा वर्षांचा कालावधी दिला जात असतो.

कोण कोण घेऊ शकतो या योजनेचा लाभ

  • ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकर कोरडवाहू क्षेत्रापेक्षा कमी शेतजमीन आहे असे अल्पभूधारक शेतकरी तसेच भूमिहीन शेतमजूर या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • ज्या शेतकऱ्यांकडे अडीच एकर बागायती शेतजमीन आहे असे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन शेत जमीन विकत घेऊ शकता.
  • या योजनेसाठी पात्र होण्यासाठी संबंधित व्यक्तीचा क्रेडिट स्कोर उत्तम असणे अनिवार्य आहे शिवाय अशा व्यक्तीने दोन वर्षाची कर्ज परतफेड केली असली पाहिजे.
  • या योजनेसाठी जर लाभ घ्यायचा असेल तर कुठल्याच बँकेचे थकीत कर्ज संबंधित व्यक्तीवर नसावे.
  • जर आपणास या योजनेअंतर्गत शेत जमीन विकत घ्यायची असेल तर आपण आपल्या जवळच्या स्टेट बँक ऑफ इंडिया ला भेट देऊन संबंधित बँक मॅनेजरला या विषयी विचारणा करू शकता.
English Summary: farm labour and minor farmland farmers get loan for land purchase Published on: 01 February 2022, 03:37 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters