मूग, उडीद आणि सोयाबीन नोंदणीसाठी 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

Thursday, 25 October 2018 07:04 AM


मुंबई:
किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हंगाम 2018-19 मध्ये मूग आणि उडीद नोंदणीसाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना दि. 15 नोव्हेंबर 2018 पर्यंत नोंदणी करता येईल, अशी माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

याआधी मूगउडीद नोंदणीसाठी दि. 24 ऑक्टोबर 2018 आणि  सोयाबीन नोंदणीसाठी 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत मुदत होती. यात बदल करुन मूगउडीद आणि सोयाबीन नोंदणीसाठी  शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत आता दि. 15 नोव्हेंबर 2018 पर्यंत नोंदणी करता येणार आहे, असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

soybean green gram black gram minimum support price MSP किमान आधारभूत किंमत मुग उडीद सोयाबीन

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.