मूग, उडीद आणि सोयाबीन नोंदणीसाठी 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
मुंबई: किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हंगाम 2018-19 मध्ये मूग आणि उडीद नोंदणीसाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना दि. 15 नोव्हेंबर 2018 पर्यंत नोंदणी करता येईल, अशी माहिती पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

याआधी मूग, उडीद नोंदणीसाठी दि. 24 ऑक्टोबर 2018 आणि सोयाबीन नोंदणीसाठी 31 ऑक्टोबर 2018 पर्यंत मुदत होती. यात बदल करुन मूग, उडीद आणि सोयाबीन नोंदणीसाठी शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत आता दि. 15 नोव्हेंबर 2018 पर्यंत नोंदणी करता येणार आहे, असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.
English Summary: extended date 15 November for purchase soybean, green and black gram by minimum support pricePublished on: 25 October 2018, 07:05 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments