राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सहसचिव ऋषिकेश म्हस्के यांची अजितदादा पवार यांच्याकडे मागणी
बुलडाणा : जलसंपदा विभागाच्या सरळसेवा भरती सन २०१९ (कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब) परीक्षा अर्जाची लिंक अद्ययावत करण्याची मुदत तात्काळ पाच दिवसाने वाढवावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सहसचिव ऋषिकेश म्हस्के पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे २१ मे रोजी एका निवेदनाद्वारे केली.
जलसंपदा विभागाची २५ नोव्हेंबर २०१९ रोजी घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्यात आली होती. प्रवेशपत्र घेऊन २५० ते ३०० कि.मी. चा प्रवास करुन परिक्षा केंद्रावर गेलेल्या विद्यार्थ्यांना ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याचे सांगण्यात आले होते. पुन्हा दुसऱ्या वेळेला सुध्दल परिक्षार्थी यांनाल प्रवेशपत्र प्राप्त झाले. परिक्षार्थी अभ्यासाची तयारी करुन परिक्षेला जाणार तोच कोरोनामुळे ही परीक्षा पुन्हा रद्द झाली.
सदर परीक्षा दोन वेळेस रद्द होवुनही परिक्षार्थी यांनी प्रशासनाला पुर्ण सहकार्य केले. आता पुन्हा ही परीक्षा घेण्यात येत आहे. ५ मे २०२२ ला परिक्षार्थीना परिक्षेसंदर्भात लिंक अद्ययावत करण्याचा ई-मेल प्राप्त झाला. यामध्ये काही परिक्षार्थींना हा ई-मेल प्राप्त झाला नाही. ज्या परिक्षार्थीना हा ई-मेल प्राप्त झाला, त्यांना तो भरतांना परीक्षा पोर्टलच्या तांत्रीक अडचनींना सामोरे जावे लागले. तसेच काही परिक्षार्थींना आजारपणामुळे व अपघातामुळे तसेच विद्यार्थीनींना प्रसुतीमुळे आणि लिंक अद्ययावत भरतांना विभागाच्या हलगर्जीपणामुळे भरण्यास परिक्षार्थींना विलंब झाला. तर १२/५/२०२२ ते १३/५/२०२२ ला तांत्रीक अडचणी आल्या. त्यामुळे सदर अर्ज परिक्षार्थींना भरता आला नाही. अडचणी आलेल्या परिक्षार्थीनी माहिती व संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण दिलेल्या हेल्पलाईन नंबर, मदत केंद्र त्याच्याशी कुठलाही संपर्क होत नव्हता.
काही परिक्षार्थींचा संपर्क झाला असून परिक्षार्थींना उडवाउडवीची, असमाधानकारक उत्तरे देण्यात आली. कधीकधी हेल्पलाईन ok नंबर संपर्क क्षेत्राच्या बाहेर दाखवत आहे. प्रशासनाच्या कार्यालयीन पोर्टलवर कुठलाही संपर्क क्रमांक परिक्षार्थींना मिळालेला नाही.
सदर परीक्षार्थी २०१९ पासुन परिक्षेची आतुरतेने वाट पाहत आहेत. २०१९ ते २०२२ तीन वर्ष सातत्याने अभ्यास करत आहे. परिक्षा दोन वेळेस प्रवेश पत्र येऊन रद्द झाली. त्यामुळे परिक्षार्थीची मानसीक आणि आर्थिक परिस्थीती ढासाळलेली आहे. मात्र प्रशासनाकडुन परीक्षा होत असल्याचे कळाल्यानंतर परिक्षार्थीमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु विद्यार्थ्यांना परिक्षेस अडचणी आल्यास,
विभागाच्या अकार्यक्षमतेने परिक्षार्थी अपात्र ठरल्यास त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. जिल्ह्यातीलच नव्हे तर सबंध राज्यातील हजारो परिक्षार्थींचा हा प्रश्न आहे. सदर पोर्टलने दिलेली लिंक अपडेट करणे बाकी आहे. त्यामुळे ते परिक्षेस अपात्र ठरु शकतात, अशी भीती परिक्षार्थींना आहे. सदर लिंक १३/५/२०२२ ला अंतीम तारीख होती. परंतु विभागाच्या व ऑनलाईन पोर्टलच्या हलगर्जीपणामुळे परिक्षार्थी वंचित राहिलेले आहे. परिक्षार्थींना लिंक अपडेट करण्यासाठी लिंक पुन्हा तात्काळ सुरु करावी, मुदतवाढीचा कालावधीही जाहीर करावा. परिक्षार्थीच्या विनंतीस मान देऊन आणि त्यांच्या प्रश्नांचे गांभीर्य पाहुन तात्काळ किमान पाच दिवसांची मुदत वाढ देण्यात यावी,
अशी मागणी ऋषिकेश म्हस्के यांनी केली आहे.
Share your comments