पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना असून या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येतात.
. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेली ही योजना खूप यशस्वी योजनांपैकी एक आहे. केंद्र सरकारने या योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी विविध प्रकारच्या नियमांमध्ये बदल केलेत. त्यातील एक बदल म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थ्यांसाठी ई केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे.
जर तुम्ही ई-केवायसी करणार नाही तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत दहा हप्त्याचे वाटप करण्यात आली असून आता 31 मे रोजी 11 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.
परंतु शासनाने आता पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा देत यासाठी बंधनकारक असलेली ही केवायसी करण्याची मुदत वाढ केली असून आता शेवटची मुदत 31 जुलै 2022 अशी राहील. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 1 कोटी 9 लाख 46 हजार लाभार्थ्यांना एकूण 18 हजार 151 कोटी 70 लाख रुपये अदा करण्यात आलेले आहेत.
यासाठी लाभार्थ्याला स्वतः पी एम किसान पोर्टल वर किंवा सीएससी सेंटर वर ही ई केवायसी पडताळणी करण्याच्या सुविधा उपलब्ध करण्यात आले आहेत. या दोन्हीपैकी आपल्याला जे सोयीचे वाटेल त्या सुविधेच्या आधारे लाभार्थ्यास त्याचीही केवायसी पडताळणी करता येईल. त्यापूर्वीही ई केवायसी 31मे 2022 पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. योजनेचे दहा हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आले असून आता अकरावा हप्ता 31 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
या योजनेचा लाभ दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या अल्पभूधारक शेतकरी कुटुंबांना उपलब्ध आहे.
महत्वाच्या बातम्या
Share your comments