1. बातम्या

मोठी बातमी! राजू शेट्टी यांच्याकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एकमेव आमदाराची हकालपट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आपल्या पक्षातून आजी आमदार देवेंद्र भुयार यांना निष्कासित केल्याची घोषणा केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच गदारोळ बघायला मिळत आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
शेट्टी (Raju Shetty) यांनी आपल्या पक्षातून आजी आमदार देवेंद्र भुयार यांची हकालपट्टी केली

शेट्टी (Raju Shetty) यांनी आपल्या पक्षातून आजी आमदार देवेंद्र भुयार यांची हकालपट्टी केली

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी आपल्या पक्षातून आजी आमदार देवेंद्र भुयार यांना निष्कासित केल्याची घोषणा केल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच गदारोळ बघायला मिळत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आमदार देवेंद्र भुयार (MLA Devendra Bhuyar) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यक्रमापासून लांब राहत असल्याने राजू शेट्टी यांनी हा निर्णय घेतला. आमदार देवेंद्र भुयार यांच्या कामकाजावर पक्षातीलच कार्यकर्ते प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याने हा निर्णय घेतला गेला असावा असे दिसत आहे.

आमदार देवेंद्र भुयार एकीकडे आपल्या पक्षाच्या (Shetkari Swabhimani Sanghtna) कार्यक्रमापासून दूर राहत असत तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेससोबत त्यांची मैत्री थोडी अधिकच घट्ट होत होती. राजू शेट्टी यांच्या कानावर वारंवार ही बातमी पडत होती.

देवेंद्र भुयार आपल्याचं संघटनेच्या कार्यकर्त्यांमधून पळ काढत असत, यामुळेच की काय हिवरखेड येथे आयोजित स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका कार्यक्रमात संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून भुयार यांना पक्षातून हद्द बाहेर करा अशा आशयाची बॅनर बाजी देखील बघायला मिळाली होती. त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी याबाबत लवकरच काय तो निर्णय घेऊ असे देखील आपल्या कार्यकर्त्यांना आश्वासन दिले होते.

आता राजू शेट्टी यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन तसेच आमदार भुयार यांचे पक्षातील कामकाज विचारात घेऊन त्यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे सांगितले जात आहे. राजू शेट्टी यांनी हा निर्णय घेतल्याबरोबर आमदार राजू भोयर यांनी आपल्या सोशल मीडियावर धन्यवाद म्हणतं शेट्टीचे आभारच मानले आहेत. यावरून राजू शेट्टी ऐवजी आमदार भोयर यांना पक्षातून बाहेर पडण्याची घाई असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आमदार भुयार यांची जरी हकालपट्टी केली गेली असली तरी त्यांची आमदारकी मात्र अबाधित राहणार आहे. कारण की भारतीय संविधानात पक्षाच्या एकमेव आमदारास पक्षांतर बंदी कायदा लागू केला जात नाही असे कलम समाविष्ट केलेले आहे. यामुळेच आमदार राजू भोईर यांना पक्षातून हकालपट्टी करण्याचे तिळमात्रही दुःख नसल्याचे समजत आहे.

संबंधित बातम्या:-

Breaking News: कृषी विभागात घोटाळा! काँग्रेस नेत्यांनी केली 'इडी'कडे तक्रार

आनंदाची बातमी! बीएएसएफ कंपनीने ऊस आणि मका पिकासाठी लाँच केले कीटकनाशक वेसनिट कम्प्लिट

मोठी बातमी! कांद्याच्या दरात मोठी घसरण म्हणून केंद्रीय मंत्री भारती पवार यांना पत्र, निघेल का यावर तोडगा?

English Summary: Expulsion of the only MLA of Swabhimani Shetkari Sanghatana from Raju Shetty Published on: 25 March 2022, 08:30 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters