1. बातम्या

जळगावची जीआय प्रमाणित केळी पोहोचली दुबईला

KJ Maharashtra
KJ Maharashtra
banana export

banana export

 जीआय प्रमाणित  म्हणजेच भौगोलिक संकेतांक प्रमाणित केळीचे आगार म्हणून ओळखला जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील केळी थेट दुबईला निर्यात करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील तांदळवाडी गावच्या प्रगतिशील शेतकऱ्यांनी जी आय  प्रमाणित  22 मेट्रिक टन केळीचे उत्पादन घेतले.

 सन 2016 मध्ये जळगाव जिल्ह्याच्या केळीला जी आय मानांकन केळीला मिळाले होते. याची नोंदणी निसर्गराजा कृषी विज्ञान केंद्र जळगाव येथे झाली होती.

 केळी उत्पादनात जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जागतिक दर्जाच्या कृषी पद्धतीचा अवलंब केल्यामुळे भारतातून होणारी केळीची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जर भारतामध्ये होणाऱ्या केळीच्या निर्मितीचा विचार केला तर मागील काही वर्षापासून सातत्याने ती वाढतच आहे. 2018 ते 19 मधील 413 कोटी रुपये मूल्य असलेल्या 1.34 लाख मेट्रिक टन वरून वाढून ते 2019-20 मध्ये 660 कोटी रुपये मूल्य आणि निर्यात 1.95 लाख मेट्रिक टन इतकी वाढली.

. तसेच 2020 21 या वर्षातील एप्रिल आणि फेब्रुवारी महिन्याचा विचार केला तर भारताने 1.91 लाख टन केळी निर्यात केले असून त्याचे मूल्य 600 एकोणवीस कोटी रुपये आहे.

 जर जागतिक पातळीवर केळी उत्पादनाचा विचार केला तर एकूण उत्पादनात भारताचा जवळजवळ 25 टक्के वाटा आहे.भारतातील केळी उत्पादनातआंध्र प्रदेश, गुजरात,तामिळनाडू,महाराष्ट्र,उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश यांचा 70 टक्के पेक्षा दुप्पट आहे.

पायाभूत सुविधा विकास, गुणवत्ता विकास आणि बाजारपेठ विकास यासारख्या योजनांच्या विविध घटकांतर्गत निर्यातदारांना सहाय्य पुरवून अपेडा कृषी व प्रक्रियायुक्त खाद्य उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देते. तसेच अपेडा, आंतरराष्ट्रीय ग्राहक विक्रेता बैठक, कृषी आणि प्रक्रियायुक्त खाद्य उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आयातदार देशांबरोबर वर्चुअल  व्यापार मिळावे  देखील आयोजित करते.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters