मुंबई: राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडल्या आहेत. तसेच अजूनही एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये शिवसेना कोणाची यावरून वाद सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना त्यांचीच असल्याचा दावा केला आहे. तर एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे ५० आमदार असल्याचा दावा करत शिवसेना आमचीच असल्याचा दावा केल्याने हे प्रकरण आता निवडणूक आयोगाकडे गेले आहे.
निवडणूक आयोगाने आम्हाला पत्र लिहिले असून आम्ही आमची बाजू निवडणूक आयोगासमोर मांडणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. आम्हीच खरी शिवसेना आहोत. लोकसभेत आमचे 50 आमदार आणि पक्षाचे दोन तृतीयांश खासदार आमच्यासोबत आहेत. असा दावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
ठरले रे बाबा! मंत्रिमंडळ विस्तार पुढील आठवड्यात; या 12 जणांना मिळणार संधी?
शिवसेनेकडे बहुमतासाठी पुरेसे सदस्य आहेत हे सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांना कागदोपत्री पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. दोन्ही गटांना आता ८ ऑगस्टला उत्तर द्यायचे आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पत्र लिहून पक्षाचे ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्ह देण्याची विनंती केली होती. शिंदे गटाने यासाठी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेत मिळालेल्या मान्यतेचा हवाला दिला होता.
प्रत्यक्षात पक्षातून बंडखोरी करून भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर शिंदे गटाने शिवसेनेवर दावा मांडण्यास सुरुवात केली. दुसरीकडे, उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी ते फेटाळत आहेत. याप्रश्नी शिंदे गट निवडणूक आयोगाकडे गेला होता. त्याचवेळी लोकसभेतील पक्षाच्या 19 पैकी 12 खासदारांचा प्रवेश शिंदे गोटात झाला आहे.
मोठी बातमी! निवडणूक आयोगाचे ठाकरे आणि शिंदे गटाला सत्ता राखण्यासाठी महत्वपूर्ण आदेश; जाणून घ्या...
त्यांनी सभागृहनेते विनायक राऊत यांच्यावर अविश्वास व्यक्त करत राहुल शेवाळे यांना नेते म्हणून घोषित केले होते. लोकसभेत त्यांना वेगळ्या गटाची मान्यताही सभापतींनी दिली आहे. त्यांचा पक्षाचा नवा व्हिप प्रमुखही नियुक्त होणार आहे. याचाच अर्थ ठाकरे कुटुंबीयांच्या हातातून शिवसेनेची कमान निसटू शकते कारण पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडे जाऊ शकते.
राजू शेट्टी ॲक्शन मोडमध्ये; उसाप्रमाणे दुधाला हमीभाव जाहीर करावा, नाहीतर...
Share your comments