गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. असे असताना आता आंध्र प्रदेशमध्ये अनेक घडामोडी घडत असल्याचे दिसून येत आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आई वाय. एस. विजयम्मा यांनी वायएसआरसीपीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांची कन्या आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची धाकटी बहीण वाय.एस. शर्मिला यांनी युवाजना श्रमिका रेथ्यु तेलंगणा पक्षाची स्थापना केली आहे.
असे असताना यामुळे वाय. एस. विजयम्मा यांनी लेकीच्या पक्षाला साथ देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी वायएसआरसीपीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे मात्र एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी आणि त्यांची बहीण वाय. एस. शर्मिला यांचे वर्षभरापुर्वी मतभेद झाले होते. त्यामुळे त्यांनी मागील वर्षी वेगळा पक्ष काढला होता.
वाय. एस. शर्मिला यांच्या पक्ष स्थापनेच्यावेळी विजयम्मा यांनी त्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिला होता, दरम्यान आज त्यांनी वायएसआरसीपीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. शर्मिलाचे पती अनिल कुमार यांनी नुकतेच आंध्र प्रदेशात नवा पक्ष स्थापन करण्याचे संकेत दिले होते. त्यांनी विशाखापट्टणममध्ये मागासवर्गीय, अनुसुचित जाती, जमाती, आणि अल्पसंख्यांकाच्या मागण्यांसाठी विविध गटांच्या भेट घेऊन चर्चा केली.
शेतकऱ्यांनो दूध डेअरी उघडण्यासाठी सरकारकडून 7 लाख रुपये मिळणार, असा करा अर्ज
वाय.एस. विजयालक्ष्मी विजयम्मा ह्यांनी सप्टेंबर 2009 मध्ये त्यांचे पती वाय. एस. आर. यांच्या रिक्त जागेवर निवडणूक लढविली होती व त्या विजयी झाल्या होत्या. 2014 साली त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती पण त्यांचा पराभव झाला होता. आता येणाऱ्या काळात देखील आंध्रप्रदेशमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या;
आता बिअरच ठरणार तुमच्या शरीरासाठी फायदेशीर, संशोधनातून आली फायद्याची माहीती समोर
शेतकऱ्यांनो मुख्य पिकांसोबत कडेला ही शेती करा, व्हाल लखपती
तरुणांनो संधीचे करा सोनं! रेल्वेत कोणतीही परीक्षा न देता थेट मेगाभरती...
Share your comments