सध्या उसाचा गळीत हंगाम सुरु होण्याच्या तोंडावर आहे. यामुळे साखर कारखान्यांची तयारी सुरु आहे. आतापर्यंत केवळ ३५ कारखान्यांनी १५ ऑक्टोबरपासून ऊसाचे गाळप सुरू करण्याची परवानगी घेतली आहे. हंगाम २०२१-२२ मध्ये १,४२० लाख टन ऊस गाळप करून १३७ लाख टन साखर उत्पादन करण्यात आले होते. यावर्षी राज्यात साखरेचे उत्पादन १ लाख टनाने वाढण्याची शक्यता आहे.
यंदाही महाराष्ट्रात गेल्या हंगामाप्रमाणे जादा ऊस उत्पादन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी गाळपाची तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात एकूण २४६ साखर कारखाने आहेत.आणि त्यापैकी २०३ कारखाने यंदाच्या, २०२२-२३ च्या हंगामात गाळप सत्रात सुरू राहतील अशी शक्यता आहे. यामुळे प्रशासनाने तयारी केली आहे.
दरम्यान, गेल्यावर्षी मराठवाडा विभागातील काही कारखान्यांना जूनपर्यंत गाळप करावे लागले. त्यांना मदत करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून ऊस तोडणी हार्वेस्टर पाठविण्यात आले होते. अनेकांचे ऊस शिल्लक राहिले. यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले होते. यामुळे आता यावर्षी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कारखाने तयारी करत आहेत.
रब्बी पिकाच्या पेरणीपूर्वी मागणीपेक्षा डीएपी ४४ टक्के कमी आणि युरिया २८ टक्के कमी, शेतकरी चिंतेत
दरम्यान, हंगाम २०२१-२२ मध्ये १,४२० लाख टन ऊस गाळप करून १३७ लाख टन साखर उत्पादन करण्यात आले होते. या वर्षी महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन १ लाख टनाने वाढण्याची शक्यता आहे. यामुळे कारखाने देखील लवकर सुरु होणार आहेत. शेतकऱ्यांचा ऊस तोडणीविना शिल्लक राहू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली होती.
लम्पीकडे दुर्लक्ष, संतप्त शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहले पत्र
राज्यात यावर्षी ऊस गाळप १,४१३ लाख टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी मोठ्या प्रमाणावर ऊस शिल्लक राहिला यामुळे याचा शेतकऱ्यांना फटका बसला. अनेक शेतकऱ्यांनी आपला ऊस पेटवून दिला होता. यामुळे यंदा अशी परिस्थिती येऊ नये म्हणून प्रशासन काळजी घेत आहे.
महत्वाच्या बातम्या;
सरकार देशातील सर्व पंचायतींमध्ये सहकारी डेअरी उघडणार, अमित शहा यांची माहिती
लसीकरणानंतरही जनावरांना लम्पीची लागण, शेतकऱ्यांची चिंता वाढली..
पुण्यात तीन दिवसीय डेअरी कार्यशाळेचे आयोजन, शेतकऱ्यांनो एकदा भेट द्याच
Share your comments