कांदा दराचा लहरीपणा काय असतो हे शेतकऱ्यांना मागील दोन महिन्यातच समजलले आहे. कांदा हंगामाच्या सुरुवातीला कांद्याला चांगला दर मिळाला मात्र आता कवडीमोल सुद्धा भाव नाही. खरीप हंगामातील लाल कांद्याची आवक सुरू असतात उन्हाळी कांद्याची सुरू आवक सुरू झाली होती. तसेच ढगाळ वातावरणामुळे होणाऱ्या नुकसाणीमुळे शेतकऱ्यांनी लगेच कांद्याची कांद्याची काढणी करून छाटणी केली आणि बाजारात कांदा दाखल केला. जो ३३ रुपये प्रति किलो जाणारा कांदा आता ९ रुपये वर आलेला आहे. शेतकरी आता कांदा विक्रीपेक्षा साठवणुकीवर भर देत आहेत. सध्या लगेच तरी दरवाढीची चिन्हे नसल्यामुळे शेतकऱ्यांनी साठवणुकीवर भर दिलेला आहे.
कांद्याचे संरक्षण आणि योग्य दरही :-
वातावरणात बदल झाला की त्याचा सर्वात आधी परिणाम होतो तो पिकावर. मागील काही दिवसांपूर्वी अवकाळी आणि ढगाळ वातावरण निर्माण झाले असल्याने कांद्याला धोका निर्माण झाला होता. कांदा हे नाशवंत पीक असून त्याची काळजी घेणे आवश्यक असते. साध्य कांद्याचे चार पटीने दर घसरले आहेत तर वाहतुकीचा सुद्धा खर्च शेतकऱ्यांना परवडत नाही. कांद्याला दर मिळावा व त्याचे सरंक्षण व्हावे यासाठी कांद्याची साठवनुक केली जात आहे. कांद्याला ऊस द्यावे लागते तसेच तो नासला आहे की नाही याची सारखी पाहणी करावी लागते.
आता भाव वाढल्यावरच विक्री :-
कांद्याचे दर जास्त वेळ टिकत नाहीत जे की याचा अभ्यास शेतकऱ्यांनी केलेला आहे. त्यामुळे आता शेतकरी वेळ साधण्याच्या शोधत आहेत. काही दिवसांच्या फरकाने कांद्याचे दर घसरले आहेत त्यामुळे कांदा उत्पादकांचे नुकसान झाले असून आता योग्य दर मिळाल्याशिवाय कांदा बाहेर काढायचा नाही असे कांदा उत्पादकांनी ठरवले आहे. जून व जुलै महिन्यात पुन्हा कांद्याचे दर वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यानी व्यक्त केली आहे.
कांदाचाळीत अशी घ्या काळजी
१. कांदा चाळीमधील कांदा सडू नये यासाठी एकाच जागी जास्त कांद्याची साठवणूक करू नये. ज्यावेळी कांद्याची साठवणूक करणार आहात त्याआधी तीन ते चार वेळा कांदा उन्हात वाळविणे.
२. कांदा वाळविला की लगेच तो गोनिमध्ये भरून ठेवू नये तसेच ढिगारा घालू नये नाहीतर कांदा सडन्याची शक्यता असते.
३. चाळीमध्ये ठेवलेल्या कांद्याची सारखी देखभाल करावी. जर कांदा खराब झाला असेल तर तो तिथून बाहेर काढून फेकून देणे गरजेचे आहे ज्याने दुसरा कांदा खराब होणार नाही.
Share your comments