इथेनॉलच्या किमतीबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सी-हेवी इथेनॉलची किंमत ४५.६९ रुपयांवरून ४६.६६ रुपये प्रति लिटर करण्यात आल्याची माहिती दिली. त्याचवेळी, बी-हेवी इथेनॉलची किंमत ५७.६१ रुपयांवरून ५९.०८ रुपये प्रति लिटरपर्यंत वाढवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
पेट्रोलियम मार्केटिंग कंपन्या सरकारने ठरवून दिलेल्या किमतीवरच इथेनॉल खरेदी करतात. २०२०-२१ या विपणन वर्षात पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण आठ टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती ठाकूर यांनी दिली. २०२५ पर्यंत ते २० टक्क्यांपर्यंत नेण्याचे भारताचे लक्ष्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (१० नोव्हेंबर) मंत्रिमंडळाच्या आर्थिक घडामोडी समितीच्या (CCEA) बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.
डिसेंबर २०२१ पासून सुरू होणाऱ्या विपणन वर्षात ऊसाच्या रसातून काढलेल्या इथेनॉलची किंमत ६२.६५ रुपये प्रति लिटरवरून ६३.४५ रुपये प्रति लीटरपर्यंत वाढविण्यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
गव्हाच्या दरात मोठी वाढ! प्रति क्विंटल 900 रुपयांपर्यंत झाली वाढ..
तसेच या बैठकीत मोहरीच्या एमएसपीमध्ये 400 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याआधी सरकारने गहू, बार्ली, हरभरा, मोहरी आणि मसूर या सहा पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ केली होती. तेव्हा सरकारने बार्लीच्या दरात प्रति क्विंटल 100 रुपयांची वाढ केली होती. त्याचप्रमाणे मंत्रिमंडळाने मोहरीच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 400 रुपयांची वाढ केली होती.
'साखर कारखाने काट्यामध्ये शेतकऱ्यांचा ऊस लुटतात'
या बैठकीत इथेनॉलच्या किमती वाढवण्याबरोबरच पी अँड के खताच्या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याचाही निर्णय घेतला जाऊ शकतो. याबाबत अधिकृत निर्णय अजून समोर आला नाही. माहितीनुसार, 2022-23 च्या रब्बी हंगामासाठी पोषक आधारित सबसिडीचे (NBS) नवीन दर लागू केले जातील. याचा थेट परिणाम खतांच्या किमतीवर होणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
एकाच दिवसात टोमॅटो 80 रुपयांवरुन 25 ते 30 रुपयांवर, शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी..
मराठवाडा टँकरमुक्त! पाण्याचा प्रश्न मिटला, भूजल पातळीत 2 मीटरची वाढ
आता लम्पीनंतर घोड्यांमध्ये ग्लेंडर्स रोगाचा शिरकाव, माणसांना देखील धोका,संसर्ग झाल्यास थेट मृत्यू..
Share your comments