ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा : कृषी आयुक्तांचे कृषी सहाय्यकांना पत्र

ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा

ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा

पुणे : कोरोना लॉकडाउनमुळे राज्याच्या खरीप हंगामाचे नियोजन विस्कळीत होऊ नये यासाठी सर्व कृषी सहायकांसोबत कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी पत्राद्वारे संवाद साधला आहे. राज्यभरात यंदा तयार होणारे ग्राम कृषी विस्तार आराखडे शेतकरीभिमुख होण्यासाठी तातडीने ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

कृषी सहायकांसाठी या पत्रात ‘प्रिय मित्रांनो’ असे शब्द पहिल्याच ओळीत आयुक्तांनी लिहिले आहेत. ‘‘आपण अतिशय निष्ठा व तळमळीने काम करीत आहात. तुम्ही शेतकरी व खात्यांमधील खरा दुवा आणि कणा आहात. राज्यात आतापर्यंत राबविलेल्या सर्व कीड-रोग मोहिमा यशस्वी होण्यास कृषी सहायकांची भूमिका मोलाची होती. तसेच विक्रमी अन्नधान्य ही सहायकांच्या परिश्रमाची फलनिष्पत्ती आहे,’’ असे कौतुकही आयुक्तांनी केले आहे.

‘‘गेल्या वर्षीपासून सुरू असलेली कोरोनाची साथ आणि निर्बंध या समस्यांमधून वाट काढत कृषी विभाग शेतकऱ्यांना वा देतो आहे. त्यात ग्रामस्तरावर कार्यरत असलेल्या कृषी सहायकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. शेती हा अविरत चालणारा व्यवसाय आहे. त्यामुळे निविष्ठा व योजनांचा लाभ योग्य वेळेत शेतकऱ्यांना मिळण्यासाठी जबाबदारीने आपला विभाग कार्यरत असतो. गेल्या वर्षीच्या लॉकडाउनपासून आपण शेतीमाल व निविष्ठांची विक्री व वाहतूक,त्या अनुषंगाने परिवहन व गृह विभागाचे परवाने उपलब्ध करणे, शेतकऱ्यांना वेळेत खते देण्याचे काम केले आहे,’’ असेही आयुक्तांनी म्हटले आहे.

 

‘‘शेतकऱ्यांसाठी घरच्या बियाण्यांचा वापर, उगवणक्षमता तपासणी मोहीम, बांधावर खत व बियाणेवाटप यासाठी आपण निविष्ठा विक्रेते व शेतकऱ्यांशी समन्वय साधला. याशिवाय टोळधाड नियंत्रण, फरदड निर्मूलन, बोंड अळी निर्मूलन, लष्करी अळी नियंत्रण या मोहिमा देखील यशस्वी केल्या. कृषी सहायकांच्या परिश्रमामुळेच २०२०-२१ च्या हंगामात कडधान्यात ८९९१० टन हरभरा आणि तेलबिया पिकांमध्ये ६२०११०० टन असे उच्चांकी उत्पादन आपल्या राज्याने घेतले. ही कृषी विभागासाठी सन्मानाची बाब आहे,” असे आयुक्तांनी नमुद केले आहे.

▪️आयुक्तांनी खालील प्रकारच्या सूचना केल्या आहेत

  • -ग्राम कृषी विस्तार आराखडा लोकाभिमुख करा, गावातील पीक उत्पादन, उत्पादकतेचे नियोजन करा,

  • गावात जमीन सुपीकता निर्देशांक फलक लावा

  • शेतकऱ्यांमध्ये खताचा संतुलित वापराबाबत जागृती

  • पाण्याच्या ताळेबंदानुसार पीक पद्धतीत बदल

  • विकेल ते पिकेल या उद्देशानुसार लागवड करा

  • गावांमध्ये सरळ वाण बीजोत्पादनाचे कार्यक्रम राबवा

  • फळबाग लागवड व शेततळ्यांसाठी शेतकरी निवड करा

  • खते, बियाणे, कीडनाशके वेळेत पुरवठ्यासाठी नियोजन करा

  • कृषी योजनांच्या ऑनलाइन अर्ज प्रक्रियेचा प्रसार प्रचार करा

  • शेतकऱ्यांपर्यंत जाण्यासाठी समूह माध्यमांचा वापर करा


प्रतिनिधी - गोपाल उगले

Commissioner of Agriculture Village Agriculture Development Committees Agriculture Commissioner Dheeraj Kumar Agriculture Commissioner Agricultural Assistant ग्राम कृषी विकास समित्या कृषी आयुक्त धीरज कुमार कृषी आयुक्त कृषी सहायक
English Summary: Establish Village Agriculture Development Committees: Letter from the Commissioner of Agriculture to the Agricultural Assistants

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.