आपल्या अमूल्य योगदानाने देशांतर्गत अभियांत्रिकेचा पाया भक्कम करणारे अभियंता भारतरत्न एम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून संपूर्ण राष्ट्रभर साजरा करण्यात येतो.याच दिनाच्या औचित्य साधत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
महाविद्यालय डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे College Dr. at Panjabrao Deshmukh Agricultural University, Akola "अभियंता दिन" उत्साहात साजरा करण्यात आला.
हे ही वाचा -एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानात अर्ज आमंत्रित
कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा विभाग प्रमुख सिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग इंजि. प्रा. डॉ. सुधीर
वडतकर यांचे अध्यक्षतेत संपन्न झालेल्या विशेष कार्यक्रमाचे प्रसंगी विद्यापीठाचे कुलसचिव तथा अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत विभागाचे विभाग प्रमुख इंजि. प्रा. डॉ. सुरेंद्र काळबांडे, मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख इंजि. प्रा.डॉ. गजानन
सातपुते, कृषी शक्ती व अवजारे विभागाचे प्रमुख इंजि. प्रा. डॉ. शैलेश ठाकरे, कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी व कृषी स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख इंजि. प्रा.डॉ. सुचिता गुप्ता यांचे सह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
Share your comments