महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी भाजप खासदार रामदास तडस यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील परिषद भारतीय कुस्ती महासंघाने काही दिवसांपूर्वी बरखास्त केली होती. यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर आता भाजपचे वर्चस्व निर्माण होणार आहे.
राज्यात सत्तांतर झाले आणि अनेक घडामोडी घडल्या. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अध्यक्ष असलेली कुस्तीगीर संघटना बरखास्त करण्यात आली. यामुळे राष्ट्रवादीसाठी हा एक मोठा धक्का मानला जात होता. ही संघटना ताब्यात घेण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली होती. याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) मैदानात होते. अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी खासदार तडस उमेदवारी अर्ज भरला होता. यामुळे संपूर्ण राज्याचे याकडे लक्ष लागले होते. दरम्यान शरद पवार यांचे वजन असलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपने तयारी केली होती. यामुळे हे मैदान कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रामराजे नाईक निंबाळकर भाजपमध्ये जाणार? सातारा जिल्ह्यातील आमदाराच्या वक्तव्याने खळबळ
गेल्या अनेक वर्षांपासून शरद पवार हे यावर अध्यक्ष म्हणून काम बघत होते. भाजप खासदार बृजभुषण सिंग (bjp mp brijbhushan singh) हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत. बृजभुषण सिंग यांनी अध्यक्षांच्या बरखास्तीची कारवाई त्यावेळी केली होती. यामुळे पवारांना हा एक मोठा धक्का मानला जात होता.
याबाबत शरद पवार म्हणाले होते की, क्रीडा क्षेत्राला खासगी किंवा सरकारी मदत मिळवून देणे हे माझे आहे. मी अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप केला नाही. अनेक खेळाडूंना मी मदत केली, हे मी आजपर्यंत कधी सांगितले नाही. यामध्ये राहुल आवारे, अभिजीत कटके, उत्कर्ष काळे, किरण भगत अशी अनेक नावे आहेत. अनेकांना वैद्यकिय आर्थिक मदत मी केली आहे, असेही ते म्हणाले.
१४ चा उतारा बसला आणि १० चा बसला तरी समान बाजारभाव का? कष्टकरी ऊस उत्पादकांवर होतोय अन्याय
दरम्यान, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या रामदास तडस यांनी काँग्रेसच्या सागर मेघे यांचा 2 लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता. संपूर्ण मेघे कुटुंबीयाने भाजपमध्ये प्रवेश केला होता. यामुळे आता काय होणार याकडे सर्वांचे लागले आहे. अध्यक्षपद घेण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत.
महत्वाच्या बातम्या;
एका वर्षात 78 वेळा पेट्रोलचे दर वाढवले, आपचा खासदार संसदेत थेट मोदींना भिडला..
देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीनंतर सर्वात मोठी आखाडा पार्टी, महेश लांडगेंचा आखाड जोरात
सर्वात लहान शेळी आणि सर्वात जास्त पैसे मिळवून देणारी शेळी, शेतकऱ्यांना होणार फायदा
Share your comments