राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तेच्या खुर्चीवर बसण्यासाठी खूप मोठी चलबिचल काही शिवसेना आमदारांची सुरू होती.आणि आज आज मुंबई येथे देवेंद्र फडणवीस पत्रकारांसमोर बोलत असताना एक मोठे विधान केले आहे. ते म्हणजे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्यानंतरच ते बोलताना पुढे म्हणाले की मी कोणतेही मंत्रीपद स्वीकारणार नाही.परंतू शपथविधी च्या आधीच काही मिनिटे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन देवेंद्र फडणवीस यांना आल्याची माहिती सूत्रांकडून आली आणि 7:30 मिनिटांनी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची नवीन विकास योजना करण्यात आली नाही. भ्रष्टाचारात २ मंत्री जेलमध्ये जाणे आणि एकीकडे मा. बाळासाहेब ठाकरेंनी सातत्याने देशाचा शत्रू असलेल्या दाऊदचा विरोध केला. दुसरीकडे त्याच्याशी संबंध ठेवलेल्या मंत्र्यांला पाठिशी घातले होते. दररोज सावरकरांचा अपमान, हिंदुत्वाचा तिरस्कार झाला होता.
जोपर्यंत विश्वासदर्शक ठराव समंत केल्याशिवाय कॅबिनेट घेता येत नाही आणि ते प्रस्ताव मंजूर केले. ते वै मानले जाणार नाहीत. पुढच्या कॅबिनेटमध्ये आम्हाला तो निर्णय घ्यावाच लागणार आहे असंही फडणवीसांनी यांनी सांगितले.दरम्यान, रोज अपमान होत असेल तर कशाच्या भरवशावर आम्ही लढायचं आहे. ज्यांना आपण हरवलं त्यांना निधी देण्याचं काम केले जात आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तोडा, आम्ही त्यांच्यासोबत राहायला तयार नाही अशी भूमिका शिवसेना आमदारांनी घेतली होती. परंतु दुर्देवाने उद्धव ठाकरेंनी आमदारांपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादीला शेवटपर्यंत धरून ठेवले आहे. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि परंतु उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर पर्यायी सरकार देणे गरजेचे आहे. आणि सरकार पडलं तर आम्ही पर्यायी सरकार देऊ असं वारंवार आम्ही सांगत होतो.
लोकांवर निवडणुका लादणार नाही आणि भाजपा-शिंदे गटाचे आमदार आणि १६ अपक्ष, घटक पक्षांचे आमदार आमच्यासोबत आले आहेत. आणखी काही आमदार आमच्यासोबत येणार आहे. आम्ही सत्तेच्या पाठिशी नाही. कुठल्यातरी मुख्यमंत्रिपदासाठी आम्ही काम करत नाही आणि ही तत्वाची, हिंदुत्वाची आणि विचारांची लढाई आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना भाजपा समर्थन देईल असंही देवेंद्र फडणवीस या वेळी बोलतना म्हणाले.राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यात नवा ट्विस्ट आला समोर आला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील आणि त्यांना भाजपाचा पाठिंबा देईल. या सरकारला माझे समर्थन असेल अशी घोषणा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेची युती होती आणि या युतीच्या माध्यमातून भाजपानं १०५ जागा आणि शिवसेनेने ५६ जागा जिंकल्या आहेत. जवळपास १६१ युती आणि अपक्ष मिळून १७० बहुमत आमच्याकडे होत आहे. भाजपा शिवसेना युतीचं सरकार तयार होईल आणि त्यावेळी पंतप्रधान मोदींनी भाजपाचा मुख्यमंत्री बनेल अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु दुर्दैवाने त्या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर शिवसेना आणि त्यांचे नेते यांनी वेगळा निर्णय घेतला होता. विशेषत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आजन्म ज्यांचा विरोध केला अशा काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली आणि भाजपाला बाहेर ठेवण्यात आले. हा खरेतर जनमताचा अपमान होत होता. जनतेचा कौल भाजपा-शिवसेनेला आहे. परंतु त्याचा अपमान करून महाविकास आघाडी अस्तित्वात आली असं त्यांनी यावेळी सांगितले.
Share your comments