1. बातम्या

खाद्य तेलाचे दर होऊ शकतात 10 टक्क्यांनी कमी

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली:
गृहणीसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृहणी महिला मोठी बचत करू शकतील. कारण खाद्यतेलाच्या किंमतीत घसरण होणार आहे. या दर घसरण्यामागचे कारण आहे ते कोरोना व्हायरस जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे खाद्यतेलाचे दर १० टक्क्यांनी कमी होतील. जागतिक किंमतींचा भारतीय बाजारपेठावर परिणाम पडत असतो.

एका वर्षात देशात वापरलेल्या जाणाऱ्या एकूण तेलापैकी २३५ लाख टन खाद्य तेलाच्या जवळपास ७० टक्के तेल आयात केले जाते. चीन खाद्यतेलाचा एक मोठा ग्राहक आहे. चीनमध्ये मागणी कमी झाल्याने स्वदेशी बाजारातही दर कमी होत आहेत. यामुळे ग्राहकाना पण फायदा होणार आहे.

आगामी आठवड्यात ब्रांडेड कुकिंग ऑइलच्या पॅकेटवर छापलेल्या किंमतीत हे दिसेल. पाम तेल आणि सोयाबीन तेलासाठी ग्राहकांना १० टक्के म्हणजे  प्रति लिटरमागे ८ रुपये कमी द्यावे लागतील. सूर्यफूल तेलाच्या किंमतीत ७ टक्के म्हणजे ५ रुपये प्रति लिटर असा दर असेल. ठोक बाजारात सोयाबीन आणि पाम तेलाची किंमत ही ७८ रुपये प्रति लिटर आहे. तर सूर्यफूल तेलाची किमत ८२ रुपये प्रति लिटर आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters