आपल्या देशात अनेक वेगवेगळ्या प्रकारची पिके वेगवेगळ्या हंगामात घेतली जातात त्यामधील काही रब्बी तर काही खरीप हंगामात घेतली जातात परंतु याचबरोबरीने भाजीपाला शेती खालील क्षेत्र सुद्धा वाढले आहे कारण वाढती मागणी आणि कोणत्याही हवामान येत असल्याने भाजीपाला लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे.
दैनंदिन जीवनात भाजीपाल्याचा वापर:-
दैनंदिन जीवनात आपल्या आहारात भाजीपाल्याचे खूप महत्व आहे. भाजीपाला सेवनामुळे आपले आरोग्य निरोगी राहते शिवाय शरीरातील रोप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते त्यामुळे भाजीपाल्याला बाजारात प्रचंड प्रमाणात मागणी आहे. कारण नियमित भाजीपाल्याचे सेवन केल्यामुळे वेगवेगळ्या रोगांपासून आपला बचाव होण्यास मदत होते. शिवाय भाजीपाला सेवनामुळे आपल्या शरीरास वेगवेगळी जीवनसत्वे मिळतात.
भाजीपाला दूध फळे हे पदार्थ नाशवंत असल्यामुळे जास्त वेळ ठेवता येत नाही. ठराविक काळानंतर आपोआप हे पदार्थ खराब व्हायला सुरुवात होते. बाजारात प्रचंड मागणी असली तरी हे पदार्थ 2 दिवसाच्या वर ठेवता येत नाहीत. या वर तोडगा म्हणून
देशातील गुवाहाटी मधील भारतीय औद्योगिक संस्थेतील काही संशोधकांनी खाद्य आवरणाची (इडिबल कोटिंग) निर्मिती केली आहे. यामुळे आता फळे आणि भाज्या जास्त काळ आपण टिकवू शकतो. या मागील उद्देश हा फक्त खाद्यपदार्थ वाया जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आहे. यामुळे आता व्यापारी वर्गाला आणि सर्व सामान्य जनतेला मोठा फायदा होणार आहे. शिवाय खाद्य आवरणासंबंधीचा हा प्रयोग वेगवेगळ्या भाजीपाल्यांवर सुद्धा केला आहे या मधे बटाटा, टोमॅटो, हिरवी मिरची, अननस, सफरचंद यांचा समावेश आहे.
हेही वाचा:-NDDB ने जनावर गाभण न राहण्याच्या समस्येवर सांगितलेले घरगुती उपचार, वाचा सविस्तर
इडिबल कोटिंग मुळे भाजिपाल्यांचा कालावधी 2 महिने:-
इडिबल कोटिंग मुळे आता फळे आणि भाजीपाल्याचा कालावधी वाढवला आहे त्यामुळे आता आपण कोणताही भाजीपाला 2 महिने टिकवू शकतो हे फक्त इडिबल कोटिंग मुळे शक्य झाले आहे. प्रयोग केल्यानंतर असे निदर्शनास आले की टोमॅटो या मद्ये 1 महिन्यापर्यंत टिकू शकतो तसेच स्ट्रॉबेरी आपण 20 दिवसापर्यंत टिकवून ठेवू शकतो.
या कोटिंगमध्ये सूक्ष्म शैवालाचा अर्क आणि पॉलिसेकेराइट हे एक घटक आहेत . यामधे वापरलेला शैवाल तेल हा माशांपासून तयार केलेल्या तेलाला एक पर्याय असून तो आपल्या आरोग्यासाठी फायदशीर असतो. शैवालातून तेल काढल्यानंतर चोथा फेकून दिला जातो. त्यामुळे आता यामुळे. सर्वानाच मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
Share your comments