शेतीला लागणारे जे नवीन नवीन तंत्रज्ञाने आहेत त्याच शोध लावणे चालूच आहे जे की काही साहित्य ज्यामुळे शेतकऱ्यांना फायदा आहे अशी साहित्य बाजारात सुद्धा उपलब्ध झालेली आहेत.लुधियाना मधील एका संस्थेने एक नवीन यंत्रणा तयार केलेली आहे ज्या यंत्रणाद्वारे अत्ता जिवंत माशांची वाहतूक करण्यात येणार आहे. या यंत्रणेमुळे ग्राहक वर्गाला अत्ता जिवंत मासे भेटणार आहेत.
लाईव्ह फिश कॅरियर सिस्टम:-
भारतातील अनेक भागात मासे खाणे हे प्रिय अन्न आहे जसे की आपल्या देशात एक वर्ग च आहे जो मासे खातो. मात्र अशी अनेक कारणे आहेत त्यामुळे मत्स्य उत्पादक शेतकरी ग्राहकांना जिवंत मासे देऊ शकत नाही.बाजारात ज्यावेळी मासे (fish) विकण्यासाठी येतात त्या त्यावेळी ते मासे मेलेले असतात त्यामुळे मच्छिमारांना माश्याची किमंत भेटत नाही. यावर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी लुधियाना या संस्थेने अत्ता उपाय काढलेला आहे.अत्ता ग्राहकांना लाईव्ह फिश कॅरियर सिस्टम द्वारे मासे पोहचवले जाणार आहेत जे की ही आधुनिक यंत्रणा ई - रिक्षा वर बसवण्यात आलेली आहे. डिसी पावर वर ही यंत्रणा चालते जे की यामध्ये चार बॅटरी बसवलेल्या आहेत.एकदा की ही यंत्रणा चार्जिंग केली की ५०० किलो वजन ८० किलोमीटर पर्यंत जाऊ शकते. जेव्हा मास्यांची वाहतूक होणार आहे ते जिवंत ठेवण्यासाठी वेंटिलेशन, फिल्टरेशन आणि अमोनिया व इतर सुविधा सुदधा उपलब्ध आहेत.
हेही वाचा:घराच्या छतावरील कुंडीत लावा कोबी,गाजर,बीट अन् खा रसायनिक खते मुक्त भाजीपाला
एकावेळी 100 किलो माशांची वाहतूक:-
या यंत्रणेची सर्वात विशेष बाब म्हणजे वाहतूक दरम्यान गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासे सुद्धा चालतात. एका वेळी १०० किलो जिवंत मासे हे वाहन वाहतूक करू शकते. जर जास्त किलो ची वाहतूक करायची असेल तर आपण त्याची क्षमता सुद्धा वाढवू शकतो. सर्वसाधारण बाजारात जर मासे वाहतूक करण्यापेक्षा त्याचा वापर आपण मत्स्यव्यवसाय म्हणून करू शकतो.
कमी किमंत जास्त उपलब्दता:-
अनेक शेतकरी वर्ग या नवीन वाहनाचा वापर करत आहे जे की या संपूर्ण यंत्रणेची किमंत २ लाख रुपये मोजावी लागते. या यंत्रणेत पाण्याचा सुद्धा बचाव होतो जे की पारंपरिक पद्धतीपेक्षा ५० टक्के पाणी या यंत्राद्वारे वाचते.ही यंत्रणा तुम्ही अगदी सहजरित्या वापरू शकता. कमी खर्च तसेच वातावरणास अनुकूल म्हणून या यंत्रणेची ओळख आहे. तुम्ही या यंत्राद्वारे ग्राहकापर्यंत जिवंत मासे पोहचवू शकता तसेच चांगली किमंत सुद्धा तुम्हाला मिळणार आहे
Share your comments