1. बातम्या

घराच्या छतावरील कुंडीत लावा कोबी,गाजर,बीट अन् खा रसायनिक खते मुक्त भाजीपाला

रसायनिक खते मुक्त भाजीपाला

रसायनिक खते मुक्त भाजीपाला

कोरोनाच्या काळात बऱ्याच लोकांना आपले छंद पूर्ण करण्यासाठी वेळ मिळाला आहे. त्यामुळे घरीच राहून लोक आपली अवड जपत आहेत. बागकाम (Gardening) असाच एक छंद आहे जो बऱ्याच जणांना असतो. पण, शहरी भागात जिथे घरं फार लहान असतात किंवा घराच्या आजूबाजूला जागाच नसते. अशात किचन गार्डनिंग (Kitchen Gardening) हा पर्याय खूप उपयुक्त आहे. लोक घराच्या टेरेस आणि बाल्कनीमध्ये भाज्या लावून आपला छंद पूर्ण करू शकतात.

आजकाल हा ट्रेंडही (Trend) खूप आहे. त्यातच किचन गार्डनिंगसाठी ऑगस्ट महिना उत्तम आहे. या महिन्यात काही भाज्या चांगल्या येतात. हिवाळ्यात बाजारात हिरव्या पालेभाज्या जास्त मिळतात. कारण पाऊस चांगला सुरू झाला की, ऑगस्ट-सप्टेंबर या महिन्यात भाज्यांची लागवड केली जाते. म्हणजेच ऑगस्ट महिन्यात काही भाज्या चांगल्या येतात.
मुळा
मुळा लावण्यासाठी एखाद्या कुंडीत माती, वाळू, कॉकपीट आणि कंपोस्ट किंवा गांडूळ खत घ्या. आधी मुळाच्या बियांपासून रोपं तयार. त्यासाठी पेपर कपमध्ये माती भरा आणि त्यात दोन बिया टाकू ठेवा. त्यावर पाणी शिंपडा आणि सावलीच्या ठिकाणी ठेवा. काही दिवसात या बियांपासून रोपं बाहेर येऊ लागतात, ही रोपे कुंडीत लावा. गरजेनुसार पाणी घाला आणि सूर्य प्रकाशात ठेवा. 90 दिवसांनी मुळा तयार होईल.

बीट
एका कुंडीत कॉकपीट, रेती आणि खत घाला. यात बिटच्या बिया लावा. त्यावर पाणी शिंपडा आणि सावलीत ठेवा. 2 ते 3 आठवड्यात रोपं उगवायला लागतील. 3 आठवड्यांनी रोपे मोठी होतील. त्यानंतर एका मोठ्या कुंडीत ही रोपं लावा. एक महिन्याने त्यावर फुलं दिसायला लागतात. 3 महिन्यांनी बीट काढू शकता.
गाजर
सर्वात आधी पॉटिंग मिक्स घालून कुंडी तयार करा. आता बोटाने समान अंतराने मातीमध्ये खड्डे करा. या खड्ड्यांमध्ये 1 ते 2 गाजराच्या बिया टाकून वरून थोडी माती घालून बिया झाकून ठेवा. यात वरून पाणी घाला. ही रोपं 15 दिवसात तयार होण्यास सुरवात होईल. पण, गाजराची रोपे वाढण्यासाठी पुरेसा सूर्यप्रकाश आवश्यक आहे. अडीच महिन्यांनी गाजर कापणीसाठी तयार होतात.

 

फ्लॉवर
एखाद्या ग्रो बॅग किंवा कुंडीत पॉटिंग मिक्स घाला. तर, कागदाच्या लहान ग्रो बॅगही तयार करा. या ग्रो बॅग मोठ्या ग्रो बॅग किंवा कुंडीत समान अंतरावर ठेवा. या लहान ग्रो बॅगमध्ये बियाणे लावा. साधारणपणे 10-15 दिवसांनी बियांना कोंब येण्यास सुरवात होईल. नियमित पाणी घालत रहा. एका महिन्यात रोपे तयार होतील. ही झाडे आता वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये लावा. याला अडीच महिन्यात फ्लॉवर येतात.
कोबी
कोबीच्या बिया किंवा घरी आणलेल्या कोबीच्या पानांपासूनही उगवता येतो. कोबीमध्ये काही कोंब दिसत असतील तर, ते कापावेत आणि कुंडीमध्ये लावावेत. यावर पाणी शिंपडावे आणि या कुंड्या उन्हातठेवाव्यात. दररोज पाणी घालावे.

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters