महाराष्ट्र शासनाने राज्यांमध्ये ई पीक पाहणी हा प्रयोग गेल्या वर्षापासून सुरू केला असून यंदाच्या खरीप हंगामासाठी ई पीक पाहणी प्रक्रिया आजपासून म्हणजे एक ऑगस्ट पासून सुरू होत असून यावेळी जमाबंदी आयुक्तद्वारे एक नवे व्हर्जन विकसित करण्यात आले आहेत. त्यामुळे आता या ॲपचा नवीन व्हर्जनमध्ये शेतकऱ्यांना पिकाच्या नोंदी घ्याव्या लागणार आहेत.
15 ऑगस्ट 2021 पासून हा प्रकल्प राज्यामध्ये राबविण्यात येत असून राज्यामध्ये मागच्या वर्षी एक कोटी 11 लाख शेतकऱ्यांनी या ॲपद्वारे पिकांची नोंदणी केली होती.
राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या शेतात केलेल्या पेऱ्याची नोंद ही ई पीक पाहणी या ॲपच्या माध्यमातून करणे आवश्यक असून या नोंदी पिक विमा,पीक विम्याची दावे तसेच पीक कर्ज वाटप व नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही पिकांचे नुकसान होते त्याच्या अचूक भरपाईसाठी खूप आवश्यक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी इ पीक पाहणी नोंद करणे गरजेचे आहे. यामध्ये रब्बी, उन्हाळी, खरीप व बहुवार्षिक पिकांची नोंद करावी लागते.
काही चूक झाली तर 48 तासात दुरुस्तीची सुविधा
शेतकरी ॲप मध्ये मोबाईल द्वारे पीक पाहणी नोंदवतात परंतु या पीक पाहणी नोंदीमध्ये काही चूक झाली तर 48 तासांच्या आत तुम्हाला ते दुरुस्ती करता येणार आहे. तसेच हमीभावाने तुम्ही नाफेडमध्ये जर पिकाच्या विक्रीसाठी नोंदणी करायचे असेल तर ही सुविधा देखील या वर्षी यामध्ये देण्यात आली असून शेतकऱ्यांना नाफेड केंद्रावर ऑनलाईन नोंदणीसाठी वाट पाहण्याची आता गरज नाही.
तसेच तुमच्या गावातील संपूर्ण पीक पाहणी नोंद देखील आता त्यामध्ये पाहता येणार आहे. यापूर्वी मुख्य पीक व दोन दुय्यम पिकांची नोंद करता येत होती परंतु या हंगामापासून एक मुख्य पीक व तीन दुय्यम पिकांच्या नोंदणीची सुविधा यामध्ये देण्यात आली आहे. याशिवाय खातेदारांना पीक पाहणी मध्ये दुरुस्ती करायची झाल्यास तलाठ्याकडे अर्ज करणे शक्य होणार आहे.
नक्की वाचा:Decision: आता अनागोंदीला बसेल अटकाव,कृषी यंत्र विक्रेत्यांना आता नोंदणी सक्तीची
Share your comments