1. बातम्या

मुख्यमंत्र्यांची घोषणा: अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना एनडीआरएफच्या निधीत रक्कम वाढवून मिळणार मदत

राष्ट्रीय आपत्ती निवारण अर्थात एनडीआरएफचे निधीमध्ये राज्य सरकारचे रक्कम वाढवून अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना मदत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी औरंगाबाद येथील विभागीय आढावा बैठकीनंतर केली. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच औरंगाबाद येथे आले व त्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्तालयामध्ये तासभर यासंबंधीचे आढावा बैठक घेतली.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
eknaath shinde

eknaath shinde

राष्ट्रीय आपत्ती निवारण अर्थात एनडीआरएफचे निधीमध्ये राज्य सरकारचे रक्कम वाढवून अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना मदत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी औरंगाबाद येथील विभागीय आढावा बैठकीनंतर केली. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे पहिल्यांदाच औरंगाबाद येथे आले व त्यानंतर त्यांनी विभागीय आयुक्तालयामध्ये तासभर यासंबंधीचे आढावा बैठक घेतली.

त्या मध्ये झालेले निर्णयाची माहिती देताना मुख्यमंत्री यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतीचे 303 कोटी तर इतर पायाभूत सुविधांचे जवळजवळ तीनशे तीस कोटी रुपयांचे नुकसान झाले असून त्यांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदती बाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये यासाठी देखील विशेष नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केले आहेत. तसेच शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज वाटपाची महत्वाची सूचना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो टेन्शन घेईचं न्हाय! पिकाचे नुकसान मिळवण्यासाठी ३१ जुलैपर्यंत असा काढा पीक विमा

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी दुष्काळी भागात वळवणार

 शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी  शासन पूर्णपणे प्रयत्न करणार असून त्याचाच एक भाग म्हणून पश्चिम वाहिनी नद्या मधून समुद्राकडे जे काही पाणी वाहून जाते, हे पाणी दुष्काळी भागात वळवण्याची योजना अमलात येणार आहे. त्यामुळे जवळजवळ पावणेचार लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. तसेच औरंगाबादला मंत्रिमंडळ बैठक घेण्यासाठी सकारात्मक विचार करू असे त्यांनी सांगितले.

नक्की वाचा:Decision: आता अनागोंदीला बसेल अटकाव,कृषी यंत्र विक्रेत्यांना आता नोंदणी सक्तीची

 मराठवाड्यासाठी केलेल्या घोषणा

1- जालना समृद्धी महामार्ग साठी आवश्यक ती सर्व मदत करण्यावर बैठकीत शिक्कामोर्तब तसेच नांदेडमध्ये भूमिगत गटार योजनेसाठी नगरोत्थान निधी दिला जाईल.

2-औंढा नागनाथ तसेच वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिर विकासासाठी निधी देण्यात येईल.

3- लातूर जिल्हा सामान्य रुग्णालय यासाठी मोफत जमीन देण्यात येणारी अडचण दूर करण्यात येईल. या सारखे बरेच घोषणा मराठवाड्यासाठी करण्यात आल्या.

नक्की वाचा:लॉटरी लागली ना भो! सरकारी कर्मचारी होणार चक्क 81,000 चे धनी, कसं ते जाणून घ्या

English Summary: cm eknaath shine announcement for compansation and marathwada farmer Published on: 01 August 2022, 12:07 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters