शेतकऱ्यांचे शेती मालाचे उत्पादन वाढावे म्हणून केंद्र सरकार सारखे प्रयत्न करत असते एवढेच नाही तर इतर जोडव्यवसाय म्हणून केंद्र सरकार त्याकडे सुद्धा लक्ष देत आहे. पशुपालकांच्या काही अडचणी असतील किंवा त्यांना योजनांचा लाभ मिळावा म्हणून ई-गोपाल अॅप तयार करण्यात आली आहे. ई-गोपाल अॅप च्या माध्यमातून आता जनावरांना टॅगिंग करता येणार आहे म्हणजेच थोडक्यात पाहायला गेले तर जनावरांना एक आधारकार्ड मिळणार आहे.
नेमका काय फायदा होणार?
जसे की आधारकार्ड वरून एखाद्या व्यक्तीची ज्या प्रकारे सर्व माहिती मिळते त्याप्रमाणे आता जनावरांची सुद्धा माहिती एका क्लिक वर मिळणार आहे. ई-गोपाल अॅपवर जनावरांची नोंदणी करणे म्हणजे जनावरांना एक प्रकारचे आधारकार्ड च मिळणे. प्रत्येक गाई तसेच म्हशी साठी एक वेगवेगळा ओळख क्रमांक दिलेला आहे. लसीकरण, जाती सुधार कार्यक्रम, वैद्यकीय व इतर काही कामे या आधारकार्डमुळे दिली जाणार आहेत. हे टॅगिंग म्हणजे जनावरांच्या कानात काही ग्रॅम वजनाचा पिवळा टॅग बसविला जाणार आहे. कानात घातलेल्या टॅगवर १२ अंकी क्रमांक असणार आहे.
रत्नागिरी तालुक्यात 28 हजार जनावरांचे टॅगिंग :-
रत्नागिरी तालुक्यामध्ये जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे ही मोहीम देण्यात आलेली आहे. या टॅगिंग मध्ये पशुपालकाचे नाव, जनावरांचे वय किती झाले आहे तसेच त्यांना कोणता आजार आहे याची सर्व माहिती दिसते. रत्नागिरी तालुक्यात जवळपास आता पर्यंत २८ हजार ५९९ जनावरांचे ९७ टक्के टॅगिंग झाले आहे.
पशुपालकांच्या अडचणी सोडविणार ‘ई-गोपाल’ अॅप :-
केंद्र सरकारने पशुपालकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ई-गोपाल अॅप काढले आहे जे की जनावरांना यामध्यमातून टॅगिंग करता येणार आहे. टॅगिंग म्हणजेच जनावरांचे आधारकार्ड असणार आहे. या आधार कार्डद्वारे एका क्लिकवर आता आपल्याला संपूर्ण जनावरांची माहिती मिळणार आहे. या महितीद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प केंद्र सरकारचा आहे त्यामुळे पशु आधार कार्ड तयार केले आहेत.
पशू आधार कार्ड फायदे :-
१. एका क्लिकवर जनावरांची सर्व माहिती भेटते.
२. जनावरांची चोरी झाली तर शोधण्यासाठी फायदेशीर.
३ जनावराचा मृत्यू झाला तर आर्थिक मदत.
४. जनावरांची विक्री करताना आधारकार्ड लागणार.
Share your comments