व्यापाऱ्यांमुळे मिरज मध्ये कांदा आणि टोमॅटो चक्क दोन रुपये किलो

21 December 2020 06:47 PM By: KJ Maharashtra

घाऊक बाजारात कांद्याचे दर पाहिले तर चाळीस रुपये प्रतिकिलो आहे. परंतु मिरजमध्ये वेगळाच प्रकार पाहायला  मिळाला. तेथे रविवारी ग्राहकांना चक्क दोन रुपये प्रति किलो दराने कांदा खरेदी करायची उत्तम संधी मिळाली.. तसेच टोमॅटोही चक्क दोन रुपये किलो मिळाल्याने ग्राहकांमध्ये अक्षरशः खरेदीसाठी झुंबड उडाली. याचे कारणही तसेच आहे व्यापार्‍यांच्या एकमेकांबद्दल असलेल्या इर्षेतून घडलेल्या या प्रकाराने काही काळ ग्राहकांची चांगली चंगळ झाली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मिरज भाजी मंडईत नेहमी टोमॅटो विक्री करणाऱ्या विक्रेता रविवारी कांदा विक्री करू लागला. हा अचानक कांदा विकून आमच्याशी स्पर्धा करतो असे म्हणत एका कांदा विक्री त्यांनी कांद्याचे दर पाडले. ईर्षेपोटी  40 रुपये किलो कांदे दोन रुपये किलोने विक्री करण्यास सुरुवात केली. चाळीस रुपये किलोचा कांदा दोन रुपये किलो मिळत असल्याने ग्राहकांची अक्षरश झुंबड उडाली.


हेही वाचा :कांद्याच्या किंमती बाबत सरकारने बनवला नवीन फार्मूला

ग्राहकांची उडालेली गर्दी इतकी होती की, ग्राहकांची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना धाव घ्यावी लागली. या वादात आर्थिक नुकसान झाल्याचे लक्षात येताच व्यापार यांचे दोन गट आमने-सामने येऊन त्यांच्यात वादावादी आणि राडा झाला. व्यापारातील आपापसातील भांडणामुळे कोणाच्या काळात ग्राहकांना कमी दरात कांदा आणि टोमॅटो मिळाले.

onion tomato price मिरज
English Summary: Due to traders, the price of onion and tomato in Miraj is around Rs 2

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.