सध्या देशामध्ये खरीप हंगाम घटण्याची स्थिती आहे कारण काही राज्यात नुकताच पाऊस सुरू झाला आहे तर काही राज्यामध्ये पावसाने हाहाकार उडवलेला आहे. या कारणामुळे हातातील खरीप जाण्याची शंका मनात भासत आहे. देशामध्ये तांदळाच्या किमती वाढू नये म्हणून सरकारने तांदूळ निर्यातीवर शुल्क लावले आहे जे की यामुळे किंमत नियंत्रणात राहील.
इतके आयात शुल्क लावणार :-
बासमती तांदूळ सोडून केंद्र सरकारने इतर सर्व तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. जे की हे शुल्क ९ सप्टेंबर पासून लागू होणार असल्याची माहिती मिळाली आहे तर एकट्या बासमती तांदळाला या निर्यात शुल्कातून सूट देण्यात आलेली आहे.
कितीने घटणार क्षेत्र :-
देशात काही भागामध्ये पाहिजे असा अजून पाऊस पडला नसल्यामुळे तांदूळ उत्पादनावर परिणाम होईल जे की कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार धान लागवडीचे क्षेत्र ५.६२ टक्केनी घटले आहे. सध्या देशात ३८३.९९ लाख हेक्टर क्षेत्रावर धान लागवड करण्यात आलेली आहे.
हेही वाचा:-पावसाचा धुवाधार कमबॅक, राज्यात या ठिकाणी जोरदार पाऊस, पुढील 2 दिवस महत्वाचे
भारताचा वाटा किती :-
जागतिक व्यापारामध्ये भारताचा तांदूळ निर्यातीबाबत ४० टक्के हिस्सा आहे जे की २०२१-२०२२ मध्ये २.१२ कोटी टन पेक्षा जास्तच तांदळाची निर्यात झालेली आहे. तर भारताने १५० पेक्षा जास्त देशात ६.११ अरब डॉलर बिगर बासमती तांदळाची निर्यात केलेली आहे.
हेही वाचा:-राज्यात शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू, वर्षाकाठी मिळणार 12 हजार रुपये.
सरकारला मोठा फायदा नाही :-
सरकारने जरी निर्यात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला असला तरी सरकारला जास्त फायदा होणार नसल्याची माहिती भेटत आहे. कारण याआधी जेवढी निर्यात शुल्क मधून जेवढी कमाई होती तेवढ्याच प्रमाणात सरकार ला महसूल मिळणार आहे. त्यामुळे सरकारला पाहिजे असा मोठा फायदा भेटणार नाही.
Share your comments