मुंबई : शेतकऱ्यांचे परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पालेभाज्यांची आवक कमी झाली असून दरामध्ये वाढ झाली आहे. मुंबईत भाज्यांच्या दरामध्ये २५ ते ३० टक्के वाढ झाली असून त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
परतीच्या पावसाचा फटका पालेभाज्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्याचबरोबर सोयाबीन, कापूस, फळबागांसहित पालेभाज्या पिकांनाही फटका बसला आहे. या नुकसानीमुळे बाजार समित्यामध्ये होणारी पालेभाज्यांची आवक सरासरीने कमी झाली आहे. त्यामुळे सध्या भाज्यांच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे.
या बाजारसमितीत कांद्याला मिळाला 5000 रुपयांचा भाव
दिवाळीमुळे भाज्यांची मागणी वाढली आहे. पण पुरवठा होत नसल्यामुळे भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. एका महिन्यानंतर पालेभाज्यांची आवक वाढणार असून त्यानंतर भाव कमी होतील अशी अपेक्षा बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दारू पिता का? ओला दुष्काळ नाही म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांचा जिल्हाधिकाऱ्यांना अजब सवाल
सध्या पावसाने विश्रांती घेतली असून पिके आणि शेतजमिनी पूर्ववत होण्यासाठी अजून एका महिन्याचा कालावधी लागणार आहे. मुंबईतील सध्याचे दर (प्रतिकिलोमध्ये) (दादर मंडईतील बाजारभाव)
गवार- 100
चवळी- 60
पालक - 60
कोथिंबीर - 40 रुपये गड्डी
कांदा पात - 20 रुपये गड्डी
बीट - 60
फुलकोबी - 60
फ्लावर - 60
कर्मचाऱ्यांची पुन्हा दिवाळी! कर्मचाऱ्यांना मोदी सरकार देणार मोठे गिफ्ट
Share your comments