बहुतांशी आपल्याकडे जास्त जास्त प्रमाणात रब्बी, खरीप आणि नगदी पिके घेतली जातात परंतु सध्या च्या काळात हे चित्र बदलू लागले आहे. विज्ञानाने केली प्रगती, यांत्रिकीकरण आणि पीक पद्धती मद्ये झालेला बदल यामुळे शेतकरी वर्गाचे जीवन सुखकर झाले आहे तसेच उत्पादनात सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून येते.
संकटांची मालिका कायम:-
शेतकरी वर्गावर संकटांची मलिका ही कायमच आहे. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी तर कधी रोगराई या मुळे शेतकरी वर्गावर मोठे संकट येते. नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकरी वर्गाला हाताशी आलेलं पीक वाऱ्यावर सोडून देऊन नुकसान सहन करावं लागत आहे. तसेच राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झालेले पाहायला मिळत आहे.
हेही वाचा:-राज्यात लम्पी च्या प्रादुर्भावाने 22 जनावरांचा मृत्यू, नेमकी उपाययोजना काय?
अतिवष्टीमुळे भाजीपाल्याची आवक घटली:-
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. भाजीपाला उत्पादक शेतकरी तर नुकसानच बुडाले आहेत कारण भाजीपाल्याच्या शेतीला जास्त पाणी चालत नाही शिवाय नाशवंत असल्याने जास्त पाणी मिळाल्यावर भाजीपाला सडायला सुरुवात होते. त्यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटून बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे त्यामुळे भाजीपाल्यांचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.
हेही वाचा:-सावधान, तुम्ही चहासोबत ब्रेड खाता का? आजच बंद करा नाहीतर होतील हे भयंकर आजार
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :
कांदा : १२०-१६०, बटाटा : १७०-२२०, लसूण : १००-४००, आले सातारी : १००-४००, भेंडी : ३००-४००, गवार : गावरान व सुरती ३००-५००, टोमॅटो : १००-२००, दोडका : ३५०-४००, हिरवी मिरची : २५०-३००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २००-२५०, काकडी : १२०-१६०, कारली : हिरवी ३००-३५० पांढरी - २००-२५०, पापडी : ३५०-४००, पडवळ : २५०-२८०, फ्लॉवर : १००-१२०, कोबी : १००-१६०, वांगी : १५०-२५०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : २५०-३००, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : २००-२५०, शेवगा : १०००-१२००, गाजर : ३००-४००, वालवर : ३५०-४००, बीट : १८०-२००, घेवडा : ४००-५००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २००-२२०, भुईमूग शेंग : ४५०-५००, मटार : ४००-७०० पावटा : ४००-४५०, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : २००-२२०, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
Share your comments