MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

लॉकडाऊनमुळे दूध पावडर अन् बटरचा साठा दूध संघात लॉक

जळगाव : कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. आता अनलॉकची प्रक्रिया केली जात आहे. पण अजून बरेच व्यावसाय बंद असल्याने अर्थ चक्र फिरण्यास अडथळा निर्माण होत आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


जळगाव : कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. आता अनलॉकची प्रक्रिया केली जात आहे. पण अजून बरेच व्यावसाय बंद असल्याने अर्थ चक्र फिरण्यास अडथळा निर्माण होत आहे. यात अडकले आहे जळगावमधील दूध संघ. लॉकडाऊनमुळे दूध व्यावसायालाही फटका बसला आहे. जळगाव दूध संघात दूध पावडर आणि बटरचा साठा पडून असल्याने दूध संघाचे जवळपास ९० कोटी रुपये अजून गोदामात अडकले आहेत.

लॉकडाऊनमुळे हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रीचे दुकान बंद असल्याने दुधाच्या मागणीत घट झाल्याने जिल्हा दूध संघाकडे एक हजार टन दूध पावडर व एक हजार टन बटरचा साठा शिल्लक आहे. यामध्ये जवळपास ८० ते ९० कोटी रुपये अडकले आहेत. संकलित दुधातून दररोज सरासरी ५० हजार लिटर दूध शिल्लक राहत आहे. मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भा वाढत गेल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले, यामुळे हॉटेल, आईस्क्रिम पार्लर, चहा स्टॉल परिणामी दुधाची मागणी घटत गेली. दरम्यान अशी स्थिती असतांना सुद्धा दूध उत्पादकांचे पगार नियमित करण्यात येत आहेत. जिल्हा दूध संघातून औरंगाबाद जिल्हा तसेच मुंबईपर्यंत दुधाचा पुरवठा केला जातो. मात्र सर्वच ठिकाणी हॉटेल, आईस्क्रिम पार्लर, चहा विक्रीची दुकाने बंद असल्याने सर्वच ठिकाणातून दुधाची मागणी घटली आहे.

संघात दररोज दोन लाख दुधाचे संकलने होत असताना मार्च - एप्रिलमध्ये केवळ एक लाख पाच हजार ते एक लाख १० हजार लिटर दुधाची विक्री होऊ लागली. अनलॉकनंतर हळूहळू मागणी वाढत जाऊन आता दीड लाख लिटर दुधापर्यंत पोहचली आहे. मात्र तरीदेखील अजूनही दररोज जवळपास ५० हजार लिटर दूध शिल्लक राहत आहे. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात दररोजचे ८० ते ९० हजार लिटर व आता दररोज ५० हजार लिटर दूध शिल्लक राहत असल्याने दूध संघाने त्यापासून दूध पावडर , बटर असे दुग्धजन्य पदार्थ तयार करणे सुरू केले . जिल्हा दूध संघात शिल्लक दुधापासून दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन वाढत जाऊन संघात आतापर्यंत एक हजार टन दुधाची पावडर व एक हजार टन बटर तयार झाले आहे.

मात्र अजूनही हॉटेल, मोठे रेस्टॉरंट सुरू झालेले नाहीत. त्यामुळे मागणीत घट झालेली आहे. दरम्यान तयार झालेल्या दुग्धजन्य पदार्थात दूध संघाचे ८० ते ९० कोटी रुपये अडकले आहेत. पण दूध उत्पादकांना नियमित पगार दिला जात असल्याचे दूध संघाचे व्यवस्थापकिय संचालक मनोज लिमये यांनी दिली. दूध संघात नियमित दूध संकलन सूरु असून मार्च - एप्रिल महिन्याच्या तुलनेत मागणी वाढली आहे. मात्र हॉटेल व इतर व्यवहार पूर्णपणे सूरू न झाल्याने दूध शिल्लक राहत आहे.

English Summary: Due to lockdown, stocks of milk powder and butter are locked in the milk sangh Published on: 02 September 2020, 09:47 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters