1. बातम्या

पोल्ट्री व्यवसाय:-उच्च तंत्रज्ञान पद्धतीचा लेअर पोल्ट्री फार्म, वाचा व्यवस्थापन

भारत हा कृषिप्रधान देश म्हणून संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. यामधे भारताची विविधता सुद्धा जगभर प्रसिद्ध आहे. भारतातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे त्यामुळे भारतातील निम्म्याहून अधिक लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. शेतीबरोबर काही संलग्न व्यवसाय सुद्धा केले जातात यामध्ये मत्स्यपालन, कुकुडपलान, वराहपालन, पशुपालन आणि दुग्ध्यवसाय हे जोडव्यवसाय केले जातात.

किरण भेकणे
किरण भेकणे

भारत हा कृषिप्रधान देश म्हणून संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. यामधे भारताची विविधता सुद्धा जगभर प्रसिद्ध आहे. भारतातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे त्यामुळे भारतातील निम्म्याहून अधिक लोक शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. शेतीबरोबर काही संलग्न व्यवसाय सुद्धा केले जातात यामध्ये मत्स्यपालन, कुकुडपलान, वराहपालन, पशुपालन आणि दुग्ध्यवसाय हे जोडव्यवसाय केले जातात.

पोल्ट्री फार्म कडे वाढता कल:-
शेतीमधून उत्पन्न चा स्रोत कायम नसल्यामुळे शेतकरी शेती सलग्न व्यवसाय करून आपला उत्पादनाचा नवीन स्रोत तयार करत आहे. शेतीबरोबर पशुपालन दुग्ध्यवसाय आणि पोल्ट्री व्यवसाय करून अधिकचे उत्पन्न मिळवत आहे. पोल्ट्री व्यवसायात फिक्स उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी वर्ग पोल्ट्री व्यवसायाकडे वळला आहे.

मेटकरी यांचा पोल्ट्री फार्म:-
अमरावती जिल्ह्यातील रवींद्र मेटेकर यांनी 1984 साली पोल्ट्री व्यवसायात पदार्पण केले होते. खडतर प्रवास आणि कष्ट करण्याची तयारी यामुळे मेटेकर पोल्ट्री व्यवसायात यशस्वी झाले. अमरावती जिल्ह्यात पोल्ट्री व्यवसायाला अधिक चालना मिळत असल्याने तेथील शेतकरी वर्गाचा कल पोल्ट्री व्यवसायाकडे वाढत चालला आहे.

हेही वाचा:-बदलत्या वातावरणात ओवा खाल्ल्याने होतात ते जबरदस्त फायदे, वाचून बसणार नाही विश्वास

 

उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प:-
सध्या पोल्ट्री व्यवसायात सुद्धा मोठे बदल झालेले आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पोल्ट्री व्यवसाय अधिक बळकट करत आहेत. मेटकर यांनी सुद्धा पोल्ट्री व्यवसायहाउत्पादन व अर्थकारण वर्षभरात प्रति पक्षी ३३० प्रांत एकूण अंडी मिळतात. वर्षभराची सरासरी काढली, तर अंड्याला तीन रुपयांपासून ते कमाल सहा रुपयांपर्यंत दर मिळतो. प्रति अंडी उत्पादन खर्च हा सव्वाचार रुपये असतो. एकूण वार्षिक उलाढाल १० ते १२ कोटी रुपयांपर्यंत आहे. सर्व स्थिती अनुकूल राहिल्यास प्रति अंडे ३० ते ४० पैसे फायदा मिळू शकतो. अर्थात, पशुखाद्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने नफ्याचे प्रमाण कमी होत आहे. मागणीत होणाऱ्या वाढीच्या काळात दरात तेजी येते आणि तूट भरून निघते. अनेक वर्षांचा अनुभव असल्याने व्यापाऱ्यांशी पूर्वीपासून संबंध जुळलेले आहेत. मध्य प्रदेश, इंदूर, भोपाळ तसेच स्थानिक व्यापाऱ्यांकडून अंडी खरेदी होते. हा उच्च तंत्रज्ञानावर आधारित पोल्ट्री व्यवसाय उभारला आहे. सध्या एकूण एक लाख ८० हजार पक्षी त्यांच्या पोल्ट्री फार्म मध्ये आहेत. तसेच त्यांचे हे पोल्ट्री फार्म 3 मजली असून त्यात 8 शेड्स आहेत. प्रत्येकशेडमद्ये त्यांनी पिंजरे बसवले आहेत आणि प्रत्येकी पिंजऱ्यात फक्त पाच पक्षी ठेवले आहे. तसेच पोल्ट्री फार्म च्या दोन्ही बाजूंना कूलिंग पॅड आहेत. तर दहा एक्झॉस्ट फॅन आहेत. उन्हाळ्यात तापमान २७ अंश सेल्सिअसच्या वरती गेल्यास सेन्सर ते सूचीत करतो. त्यानुसार कूलिंग पॅड्‍स सुरू होतात.

हेही वाचा:-बाप रे! हवेत उडणारी बाईक येतेय तुमच्या भेटीला, किंमत ऐकून व्हाल थक्क

 

उत्पादन व अर्थकारण:-
एक पक्षी प्रती वर्षात 330 अंडी देतो त्याचा हिशोब काढला तर एका अंड्याची किंमत ही 4 ते 8 रुपयांच्या दरम्यान असते.
वर्षभरात प्रति पक्षी ३३० प्रांत एकूण अंडी मिळतात. वर्षभराची सरासरी काढली, तर एकूण अंदाजे अंड्याची वार्षिक उलाढाल ही १० ते १२ कोटी रुपयांपर्यंत आहे. सर्व स्थिती अनुकूल राहिल्यास प्रति अंडे ३० ते ४० पैसे फायदा मिळू शकतो. अर्थात, पशुखाद्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने नफ्याचे प्रमाण कमी होत आहे. मागणीत होणाऱ्या वाढीच्या काळात दरात तेजी येते आणि तूट भरून निघते. अनेक वर्षांचा अनुभव असल्याने व्यापाऱ्यांशी पूर्वीपासून संबंध जुळलेले आहेत. मध्य प्रदेश, इंदूर, भोपाळ तसेच स्थानिक व्यापाऱ्यांकडून अंडी खरेदी होते.

English Summary: Poultry Business:- Hi-Tech Layer Poultry Farm, Read Management Published on: 21 September 2022, 03:33 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters