अतिवृष्टीग्रस्तांना मिळणार्‍या मदतीला आचारसंहितेचा अडथळा

09 November 2020 03:02 PM

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी कोरडी जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणारी भरपाईपोटी रक्कम राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणुकीमुळे लागलेल्या आचारसंहितेच्या तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीचा मुहूर्त लांबणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. त्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदतीसाठी १० हजार कोटींचा पॅकेज मंजूर केले. ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता.

 मात्र राज्यात सध्या पदवीधर आणि शिक्षक या विधानपरिषदेच्या मतदार संघातील ५ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळामध्ये ही मदत शेतकऱ्यांना देण्यासाठी निवडणूक आयोगाची मान्यता आवश्यक आहे. येत्या शुक्रवारपासून दिवाळी सणाला सुरुवात होत आहे. महाराष्ट्र सरकारकडे फक्त ४ दिवसांचा वेळ शिल्लक राहिला आहे. जर निवडणूक आयोगाचा विचार केला तर शनिवारपर्यंत निवडणूक आयोगाने राज्य सरकारला वाटपासाठीचे संमती दिलेली नव्हती. तसेच अजुनही अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करणे सुरूच आहे, असे मदत व पुनर्वसन विभागातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ही मदत देण्यासाठी अडचण येण्याची शक्यता आहे.

 

 

या योजनेअंतर्गत जिरायत आणि बागायत शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टरी १० हजार रुपये तर फळबागांसाठी प्रत्येकी २५ हजार रुपये इतकी मदत जाहीर करण्यात आली आहे. यासाठी कमीत कमी शेतक-यांसाठी दोन हेक्टर आणि फळपीक बागांसाठी दोन हेक्टर हे क्षेत्राच्या बाबतीतली कमाल मर्यादा आहे. त्यासाठी जवळ-जवळ ४५०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.

flood victims financial assistance code of conduct अतिवृष्टीग्रस्त आचारसंहिता नुकसान भरपाई
English Summary: due to Code of Conduct assistance to flood victims will not get

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.