को - जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने देशपातळीवरील पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट को - जनरेशन पॉवर प्लांटचा पुरस्कार बिद्री ता. कागल येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला होता.
यामुळे येथील प्रशासनाचे अभिनंदन केले जात आहे. बिद्री साखर कारखान्याने (Bidri Sugar Factory) आर्थिक नियोजन आणि उत्तम प्रशासन यांच्या जोरावर देशातील सहकारी संस्थांसमोर आदर्श निर्माण केला आहे. यामुळे याची दखल घेण्यात आली आहे.
राज्य पातळीवरील पुरस्कारांत या कारखान्याने सातत्याने आघाडी घेतली आहे. कारखान्याने आता प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवून 'बिद्री'ने देशातही आपली ओळख निर्माण केली आहे. यामुळे माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी देखील त्यांचे कौतुक केले आहे.
सरकारने संभाजीराजेंना मॅनेज केल्याचे दिसतंय, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांच्या आरोपाने खळबळ
बिद्री'चा देशपातळीवरील हा सन्मान राज्यासाठी गौरवास्पद असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमात को - जन इंडियाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार सुपूर्द करण्यात आला.
मोठी बातमी! शेतकरी नेते पाशा पटेलांना पुत्र शोक, हसन पटेल यांचे निधन..
यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री विश्वजित कदम, राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आदी उपस्थित होते. तसेच शेतकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या;
हवामानात मोठा बदल! आजपासून 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरवात, पंजाबराव डख यांची माहिती..
बारामती ॲग्रोच्या अडचणी वाढण्याची शक्यता, तानाजी सावंत यांनी भरले कारखान्याचे 9 कोटी...
1 सप्टेंबरपासून दुधाचे दर 7 रुपयांनी वाढणार, जाणून घ्या काय असणार दर..
Share your comments