सध्या पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहेत. यावर्षी पावसाने पाठ फिरवली असून शेतकरी चिंतेत आहे. लावलेली पिके जगवायची कशी हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एकीकडे गंभीर होत चालला आहे.
तसेच २० ते २५ दिवसापासून पावसाने खंड दिल्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. आता जरी नव्याने पेरणी करण्याची वेळ आली तरी पैसे कोठून आणायचे अशी समस्या शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. यामुळे शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत.
याच पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस-पवार सरकारकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मदत व पुनर्वसन विभागाने मंजूर झालेल्या १५०० कोटी रुपयांपैकी पहिल्या टप्प्यातील २१० कोटी ३० लाख रुपयांचा निधी अतिवृष्टीने नुकसानग्रस्त ३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना आनंदाची बातमी! राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता लवकरच वितरित होणार
त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पढील शुक्रवार पर्यंत आणखी अडीच लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये १७८ कोटी २५ लाख रुपयांचा निधी जमा केला जाणार आहे, अशी माहिती मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे.
त्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई केवायसी करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. राज्यावर सध्या दुष्काळाचे संकट घोंगावत आहे. जर येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.
कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता विकासासाठी विशेष कृती योजना, 1 हजार कोटींना मंजुरी
शिवाय जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन चारा खरेदी करावा लागत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे त्यांना मदत करणे गरजेचे आहे.
पुणे जिल्ह्यातील 'या' ७ तालुक्यात बैलगाडा शर्यत बंद! प्रशासनाचा निर्णय, लम्पीचा प्रादुर्भाव वाढला..
Share your comments