देशातील सर्वोच्च पदावर द्रौपदी मुर्मू विराजमान झाल्या आहेत. सोमवारी सकाळी 9.30 वाजता त्या राष्ट्रपती भवनात पोहोचल्या. मावळते राष्ट्रपती रामनात कोविंद यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्व मंत्रिमंडळ उपस्थित होते. यावेळी त्यांना त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर सव्वा दहा वाजेच्या सुमारास देशाचे सरन्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांनी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची शपथ दिली.
आदिवासी समाजातील महिला राष्ट्रपती झाल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला. यावेळी राष्ट्रपती म्हणाल्या की, स्वतंत्र भारतात जन्मलेली मी देशाची पहिली राष्ट्रपती आहे. जिचा जन्म स्वतंत्र भारतात झाला. स्वतंत्र भारतातील नागरिकांसह आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपले प्रयत्न वाढवायचे आहेत.
तसेच संसदेत माझी उपस्थिती भारतीयांच्या आशा आणि हक्कांचे प्रतीक आहे. मी सर्वांचे आभार व्यक्त करते. तुमचा विश्वास आणि पाठिंबा मला नवीन जबाबदारी घेण्याचे बळ देत आहे. स्वतंत्र भारतात जन्मलेला मी पहिला राष्ट्रपती आहे. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी भारतीयांवर ठेवलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचणे हे माझे वैयक्तिक कर्तृत्व नसून देशातील सर्व गरिबांचे ते यश आहे.
तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा धक्का! मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय..
माझे नामांकन हा पुरावा आहे की भारतातील गरीब केवळ स्वप्ने पाहू शकत नाहीत, तर ती स्वप्ने पूर्णही करू शकतात. भारताचे राष्ट्रपती देशाच्या राजकीय संस्थांच्या कामकाजावर देखरेख ठेवतात, जेणेकरून त्या राज्याची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एकत्र काम करू शकतील. देशाची राज्यघटना वाचली तर, दिसून येईल की असे काहीच नाही जे राष्ट्रपती करू शकत नाहीत.
महत्वाच्या बातम्या;
राज्यात वाढणार नवीन सहकारी कारखाने? कारखान्यांना परवानगी देण्याची मागणी
सरकारचे हे कार्ड शेतकऱ्यांचे उत्पन्न करणार दुप्पट, शेतकऱ्यांनो जाणून घ्या सर्व माहिती
फक्त १८ दिवसात तयार होणारे हे खत शेतकऱ्यांना देत आहे नवसंजीवनी, घरीच करा तयार...
Share your comments