डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांना 4 सप्टेंबर 2022 रोजी कुलगुरू पदाची 5 वर्षे यशस्वीपणे पूर्ण होत त्यांचा कुलगुरू पदाचा कार्यकाळ संपुष्टात आला. माननीय राज्यपाल महोदयांचे निर्देशानुसार संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीचे कुलगुरू प्राध्यापक डॉ. दिलीप मालखेडे यांच्याकडे विद्यापीठाचे कुलगुरू पदाचा प्रभार 5 सप्टेंबर रोजी सकाळीच सुपूर्द
करण्यात आला. त्यानंतर दुपारी तीन वाजता कृषी महाविद्यालयाच्या समिती सभागृहात कुलसचिव कार्यालयाचे वतीने माजी कुलगुरू डॉ. विलास भाले यांचे सन्मानार्थ "कृतज्ञता व निरोप समारंभाचे" आयोजन करण्यात आले होते.Dr. A "Gratitude and Farewell Ceremony" was organized in honor of Vilas Bhale. विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. विलास खर्चे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या अतिशय भावपूर्ण आणि कौटुंबिक
सोहळ्यात सौभाग्यवती कीर्ती विलास भाले आणि इंजि.सागर विलास भाले यांची विशेष उपस्थिती होती.याप्रसंगी मंचावर विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. धनराज उंदीरवाडे, संचालक शिक्षण डॉ. श्यामसुंदर माने,अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. सुधीर वडतकर,अधिष्ठाता उद्यानविद्या डॉ. देवानंद पंचभाई यांचे सह आयोजक
कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे यांची उपस्थिती होती. तर सभागृहात विशेषत्वाने शेतकरी प्रतिनिधी श्री आप्पा गुंजकर बुलढाणा, जय गजानन शेतकरी समूहाचे श्री जगन्नाथ कराळे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे आणि डॉ. निलेश अपार, श्रीमती रजनी लोणारे विद्यापीठ नियंत्रक श्री प्रमोद पाटील, सहयोगी अधिष्ठाता डॉ.ययाती तायडे
Share your comments