गेल्या काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारचा वाईन विक्री बाबतचा एक वादग्रस्त निर्णयावर संपूर्ण राज्यात मोठा गदारोळ माजला आहे. ठाकरे सरकारने नुकतेच 1000 स्क्वेअर फुट पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या किराणा दुकानात आणि सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीला परवानगी दिली, या निर्णयाचे मायबाप सरकारने तोंड फोडून स्वागत केले तर प्रमुख विपक्ष दल भाजपाने याचा कडाडून विरोध केला. राज्याचे माजी मुख्यमंत्री व विपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकार महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवण्यासाठी तत्पर असल्याचा घणाघात केला होता.
याशिवाय, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व लोकपाल आंदोलनाचे जनक रावळपिंडीचे भूषण म्हणून देशात विख्यात श्रीमान अण्णा हजारे यांनी याला कडाडून विरोध केला. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून ठाकरे सरकारच्या या निर्णयाला मोठा विरोध जरी होत असला तरी मात्र ठाकरे सरकारचा निर्णय द्राक्ष बागायतदारांच्या हिताचा असल्याचे बागायतदारांकडून सांगितले जात आहे.
श्रीमान अण्णा हजारे यांनी या निर्णयाचा विरोध केला शिवाय त्यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात आमरण उपोषण करण्याचे देखील सांगितले, याच पार्श्वभूमीवर द्राक्ष बागायतदारांनी अण्णा हजारे यांना एक निवेदन दिले आहे. द्राक्ष बागायतदारांच्या मते, महाराष्ट्रात जवळपास दहा हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्षाची लागवड केली गेली आहे, या एवढ्या मोठ्या क्षेत्रातुन 40000 द्राक्ष बागायतदार आपला उदरनिर्वाह भागवतात. त्यामुळे ठाकरे सरकारचा एक हजार स्क्वेअर फूट पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या किराणा दुकानात तसेच सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय द्राक्ष बागायतदारांच्या हिताचा असून यामुळे 40000 द्राक्ष बागायतदार आर्थिक सुबत्ता प्राप्त करू शकतात. त्यामुळे अण्णांनी या निर्णयाला विरोध करू नये या आशयाचे निवेदन द्राक्ष बागायतदारांनी अण्णांना दिले.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघटनेचे उपाध्यक्ष कैलास भोसले, यांच्या नेतृत्वात यासंदर्भात अण्णा हजारे यांना निवेदन देण्यात आले. द्राक्ष बागायतदार संघटनेचे निवेदन देण्याचे कारण असे की, 14 तारखेपासून अर्थात आज पासून ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे ठाकरे सरकारच्या वाईन विक्री धोरणविरोधात आमरण उपोषणासाठी बसणार होते. त्यामुळे द्राक्ष बागायतदार संघटनेने अण्णांना निर्णयाचा विरोध न करण्याचे निवेदन केले. यासंदर्भात त्यांनी अण्णांना पत्र देखील दिले आहे. यावेळी द्राक्ष बागायतदार संघटनेने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की ठाकरे सरकारने एक हजार स्क्वेअर फूट पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या किराणा दुकानात तसेच सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय द्राक्ष बागायतदारांच्या हिताचा आहे, द्राक्ष बागायतदार ठाकरे सरकारच्या या निर्णयाचे हात खोलून स्वागत करीत आहे. द्राक्ष बागायतदारांनी पुढे बोलताना सांगितले की, ठाकरे सरकारच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळात जो गदारोळ चालू आहे तो त्वरित थांबला पाहिजे व या द्राक्ष बागायतदारांच्या हिताच्या निर्णयावर राजकारणी लोकांनी आपल्या पोळ्या भाजल्या नाही पाहिजेत, यावेळी संघटनेने वाईन ला दारू म्हणू नये असे देखील मत व्यक्त केले.
ज्येष्ठ समाजसेवक श्रीमान अण्णा हजारे द्राक्ष बागायतदार संघटनेच्या मताचा आदर करतील अशी आशा संघटनेच्या उपाध्यक्षांनी व्यक्त केली, तसेच सांगितले की सरकार फळांच्या फुड प्रोसेसिंग साठी अनुदान देते, हा देखील फुड प्रोसेसिंगचा एक भाग असून केवळ द्राक्षाचा रस आहे याची तुलना दारूशी करणे कदापि योग्य नाही. पुढे संघटनेने सांगितले की, ठाकरे सरकारचा हा निर्णय द्राक्ष बागायतदारांच्या हिताचा आहे जर हा निर्णय कुठल्याही कारणांनी रद्द झाला तर द्राक्ष बागायतदारांना आत्महत्या करण्याखेरीज कुठलाच पर्याय उरत नाही.
Share your comments