सध्या ऊस गाळप हंगाम सुरू होत असून कारखान्यांनी तयारी सुरू केली आहे. असे असताना शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी देखील ज्या कारखान्यांनी ऊसदर दिले नाहीतर त्यांना इशारा दिला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नुकतीच त्यांनी ऊस परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ज्या साखर कारखान्यांनी मागील वर्षाची एफआरपी पूर्ण दिलेली आहे. तसेच यावर्षीची एफआरपी मागील वर्षाची सरासरी रिकव्हरी धरून एकरकमी एफआरपी जाहीर केलेली आहे.
त्या साखर कारखान्यांना ऊस तोडणेसाठी अडथळा आणू नये. असे आवाहन त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. २१ व्या ऊस परिषदेत त्यांनी अनेक निर्णय घेतले आहेत.
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा ऊसदर जाहीर
यामध्ये मागील वर्षाच्या सरासरी रिकव्हरीने एकरकमी एफआरपी यावर्षी तुटणाऱ्या उसाला कारखान्यांनी जाहीर करावे. व उर्वरीत ३५० रूपये हंगाम संपल्यानंतर द्यावे. मागील वर्षी तुटलेल्या उसाची एफआरपी + २०० रूपये द्यावे.
त्यासाठी १६ नोव्हेंबर पर्यंत शेवटची मुदत असून मागील २०० रूपये न देणाऱ्या साखर कारखान्यांचे १६ नोव्हेंबर पासून ऊस तोडी बंद पाडल्या जातील. साखर कारखान्यांचे वजन काटे ऑनलाईन करणेसाठी करावे, जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही.
तसेच मशिन तोडणी कपात १.५ टक्के करणेसाठी ७ नोव्हेंबर रोजी पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. यामुळे आता याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
भोंग्याचा आवाज झाला आणि सभासदांनी जल्लोष केला! अखेर भीमा पाटस सुरू होणार
कोल्हापूरमध्ये भारतातील सर्वात मोठे अंडे! कोंबडीने घातले 210 ग्रॅम वजनाचे अंडे..
सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नाही- कृषीमंत्र्यांची माहिती
Share your comments