कमी गुंतवणूकीतील स्वदेशी व्यवसाय , होईल भरघोस कमाई

12 October 2020 11:12 AM


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  देशाला स्वावलंबी बनविण्यासाठी स्वदेशी व्यवसायाला प्रोत्साहन देत आहेत. गावातील नागरिकांना गावातच उद्योगधंदे निर्माण करण्याची संधी सरकार देत आहे. यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकार शेतीक्षेत्राच्या विकासाबरोबरच गावा-गावांमध्ये उद्योगधंद्यांना वाढविण्याच्या कामात मदत करीत आहेत. ग्राम उद्योग विकास योजनेच्या माध्यमातून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग( एम एस एम ई) मंत्रालयाद्वारे अनेक योजना राबवल्या जात  आहेत. आज आपण काही स्वदेशी व्यवसायाविषयी माहिती घेणार आहोत जे आपल्याला मालमाल बनवतील.

काय आहे स्वदेशी व्यवसायाचा अर्थ –

अगदी बरोबर तुम्ही जो अर्थ लावला अगदी तोच अर्थ आहे. जे उत्पादने स्वतःच्या देशात बनवून देशातील बाजारात विकल्या जातात. त्याला स्वदेशी व्यवसाय म्हणतात. हे स्वदेशी व्यवसाय कमी खर्चात सहज सुरू करता येतील. त्यात भर म्हणून हे व्यवसाय सुरू करताना सरकार अनुदानावर कर्जही देते. यामुळे या व्यवसायातून होणारी कमाई ही आपल्या फायद्याचीच असेल यात शंका नाही.

दुधाचा व्यवसाय

हा व्यवसाय एखाद्या गावात किंवा छोट्या शहरात  सुरू केला जाऊ शकतो. दुधापासून तूप, लोणी, दही, दूध  प्रोडक्ट आणि चॉकलेट तयार केली जातात. यात गायीच्या दुधाला मोठी मागणी असते. सारख्या गाईच्या दुधाची उत्पादने तयार करण्यास सुरुवात करू शकता. ही सर्व उत्पादने गायीच्या दुधाच्या साहाय्याने तयार केली जातात. विशेष म्हणजे गाईच्या दुधाच्या उत्पादनांची मागणी बाजारात कायम असते.  अशाप्रकारे या स्वदेशी व्यवसायातून चांगला नफा देखील मिळवता येतो. आपण स्वत: साठी आणि कंपनीसाठी वेगळी ओळख देखील तयार करू शकता. यामुळे नफा दुप्पट करण्यास मदत होते.

 


गो-
मूत्राचा व्यवसाय:

फक्त गाईचे दुधच नाही तर मूत्रदेखील वेगवेगळ्या उद्देशांसाठी वापरले  जाऊ शकते. आपण गोमूत्रचा देखील एक चांगला व्यवसाय सुरू करू शकता. हे लक्षात घेण्यासारखे आहे की गोमूत्राच्या साहाय्याने आपण अर्क, अंघोळीसाठी साबण, डिटर्जंट पावडर, शॅम्पू आणि फिनाईल सारखी उत्पादने तयार करू शकता. याद्वारे बनविलेली ही उत्पादने शरीरासाठी खूप फायदेशीर मानली जातात. विशेष म्हणजे एखादी व्यक्ती घरातून सहजपणे गोमूत्र व्यवसायाची सुरुवात करू शकते आणि नफा कमावू शकेल.

इतर स्वदेशी व्यवसाय कल्पनाः

वरील देशी व्यवसाय कल्पनांखेरीज तुम्ही इतर अनेक प्रकारचे स्वदेशी व्यवसाय करु शकतो. यात मोबाईल दुरुस्ती, घरगुती वस्तू, मोटार दुरुस्ती, मोटारसायकल दुरुस्ती हे व्यवयाय करु शकतात. या व्यवसयातून आपण स्वता च्या दुकानेच मालक असाल दोन पैशासाठी चाकरी करण्याची गरज नाही.

Domestic business स्वदेशी व्यवसाय केंद्र सरकार दुधाचा व्यवसाय dairy business
English Summary: Domestic business with low investment , will earn a lot of money

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.