आपण जगात विभिन्न प्रकारच्या भाज्या, फळे यांची नावे ऐकत असतो. त्यातील काही आपल्या विशिष्ट गुणधर्मामुळे, विशेषतः चव किंवा आकार यांमुळे ते ओळखले जातात. आज अशाच एका फळाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. हे फळ सर्वाधिक जास्त आपल्या नावानेच वेगळेपण दर्शवते. त्याच्या नावाप्रमाणे त्याची चवदेखील अनोळखी आहे. ते फळ म्हणजे जंगल जलेबी.
जंगल जलेबी या फळाला गंगा जलेबी किंवा किकर या नावानेही ओळखले जाते. उष्णकटिबंधीय भारतीय फळ म्हणून या फळाला मानले जाते. या फळात भरपूर प्रमाणात प्रोटीन, कॅलरीज, फाइबर, कॉम्प्लेक्स कार्बोहाइड्रेट सारख्या आवश्यक असणारे पोषक तत्वे आहेत. तर आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत जंगल जलेबी या फळाचे फायदे आणि दुष्परिणामांबद्दल.
पोटाच्या समस्येला आराम देण्यासाठी, दाताला मजबूत करण्यासाठी तसेच एनीमिया विरुद्ध लढण्यास सक्षम असे हे फळ आहे. शिवाय इम्यूनिटी वाढवण्यासाठी हे फळ फायदेशीर आहे. मधुमेह सारख्या रोगावरसुद्धा फायदेशीर असे हे फळ आहे. त्वचेला स्वस्थ ठेवण्यासाठी, कोलेस्ट्रॉलला आटोक्यात आणण्यासाठी तसेच शरीराला कुठे सूज आली असेल तर त्यावर मलम म्हणून हे फळ गुणकारी आहे.
एखाद्या गोष्टीचे फायदे असतील तर त्यांपासून होणारे दुष्परिणाम पण असतात. या फळाचा तीव्र सुगंध काही प्रमाणात हानिकारक ठरू शकतो त्यामुळे आवश्यक असेल तेवढेच त्याचे सेवन करणं गरजेचं आहे. या फळाचा वापर करत असताना त्याच्या बाहेरील आवरणाचा वापर सावधानीने करावा कारण यांतून त्वचेसंबंधित सुद्धा समस्या उद्धभवू शकते. डोळ्यात जळजळ होण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
गर्भवती महिलांनी याचे सेवन करणे टाळावे. अधिक मात्रामध्ये या फळाचे सेवन केल्यास अपचन सारख्या समस्येला सामोरे जावे लागेल. शिवाय किडनीवर परिणाम होऊन भविष्यकाळात किडनी फेलियर सारखी समस्या निर्माण होईल. जंगल जलेबी स्वास्थ्य साठी लाभकारी असे फळ आहे. तुम्हीही कोणत्या शारीरिक आजारापासून ग्रस्त आहेत तर या फळाचे सेवन करू शकता. मात्र सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याने करावे.
महत्वाच्या बातम्या;
जनावरांना विषबाधा झाल्यास दगावत आहेत जनावरे, शेतकऱ्यांनो 'हे' उपाय करून टाळा विषबाधा..
आता पशुधन विमा योजना लवकरच होणार सुरु, अनेकांना होणार फायदा
शेतकऱ्यांनो 'या' म्हशीच्या जातींचे करा संगोपन, होईल बक्कळ फायदा..
Share your comments