1. बातम्या

शेती करताय का? मग तुम्हीही मिळवू शकता दोन लाखापर्यंतचा पुरस्कार; जाणून घ्या पुरस्कारांची माहिती

KJ Maharashtra
KJ Maharashtra
जाणून घ्या पुरस्कारांची माहिती

जाणून घ्या पुरस्कारांची माहिती

शेतकर्‍यांनी पुन्हा शेतीकडे वळले पाहिजे, यासाठी केंद्र सरकार व शेती सुधारण्याच्या दृष्टीने काम करणाऱ्या अनेक खासगी संस्था शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी वेळोवेळी पुरस्कार देऊन पुरस्कृत करतात. भारत हा कृषीप्रधान देश आहे.

देशातील सुमारे 50 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. गेल्या काही वर्षात असे दिसून आले आहे की सतत शेतीत होणारा तोटा यामुळे शेतकरी शेतीपासून दूर जाताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पुन्हा शेतीकडे वळले पाहिजे, यासाठी केंद्र सरकार व शेतीच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्या अनेक खासगी संस्था शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी वेळोवेळी पुरस्कार देतात.

उत्कृष्ट शेतीसाठी बळीराजांना ICAR देते पुरस्कार

भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर- https://icar.org.in/ ) ही कृषी क्षेत्रासाठी काम करणारी एक प्रमुख संस्था आहे. शेतीशी संबंधित बहुतेक निर्णय, नवीन धोरणे, नवीन तंत्र आणि शेतीशी संबंधित नवनवीन उपक्रमांविषयी येथे निर्णय घेतले जातात. याशिवाय दरवर्षी शेतीत उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकर्‍यांनाही ही संस्था प्रोत्साहित करते. चला तर मग जाणून घेऊया आयसीआर दरवर्षी कोणत्या पुरस्कारासाठी शेतकऱ्यांना सन्मानित करते.

जगजीवन राम अभिनव किसान पुरस्कार / जगजीवन राम अभिनव शेतकरी पुरस्कार

  • शेतीत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपले उत्पन्न वाढविणार्‍या शेतकर्‍यांना दरवर्षी राष्ट्रीय पातळीवर 3 पुरस्कार दिले जातात. एक लाख रुपये रोख रक्कम, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या बरोबरच पुरस्कारप्राप्त शेतकऱ्याने संस्थेचा प्रचार प्रसार चांगल्या पद्धतीने करावा म्हणून सम्मान रक्कमही दिली जाते.

एन. जी. रंगा शेतकरी पुरस्कार

  • शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या शेतीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी एनजी रंगा शेतकरी पुरस्काराची स्थापना केली गेली. या पुरस्कारांतर्गत शेतकऱ्यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रकाव्यतिरिक्त एक लाख रुपयांचे रोख बक्षीसही दिले जाते.

हलधर जैविक कृषी पुरस्कार

  • सेंद्रीय पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकर्‍यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी हलधर सेंद्रीय शेतकरी पुरस्कार देण्यात येतो. यासह एक लाख रुपयेही दिले जातात पण हा पुरस्कार सेंद्रीय प्रामाणिकरण संस्थेचे प्रमाणपत्र असणार्‍या आणि सेंद्रीय शेतीचा 5 वर्षांचा अनुभव असणाऱ्या शेतकऱ्यांना हा पुरस्कार देण्यात येतो.

पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योसदय कृषी पुरस्कार

  • पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योर्दयी कृषी पुरस्कार हे प्रत्येक वर्षाला अल्पभूधारक, लहान आणि भूमिहीन शेतकर्‍यांच्या योगदानास मान्यता देण्यासाठी दिले जातात. जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेतीचा लाभ मिळू शकेल. या अंतर्गत स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रकाव्यतिरिक्त एक लाख रुपये देण्याची तरतूद या पुरस्कारात आहे. वर्षात तीन पुरस्कार देण्याचे प्रावधान या पुरस्कारात आहेत.

महिंद्रा ग्रुपही शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी उत्कृष्ट शेतीबद्दल पुरस्कार देते.

  • महिंद्रा ग्रुपच्या वतीने नेहमीच शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि नवीन प्रयोगासाठी दरवर्षी महिंद्रा समृद्धी भारत कृषी अवॉर्ड अंतर्गत राष्ट्रीय आणि क्षेत्रीय स्तरावर पुरस्कार देते. ज्यामध्ये कृषक सम्राट (पुरुष गट), कृषी प्रेरणा सन्मान (महिला), कृषी युवा सन्मान (युवा) देण्यात येतात या पुरस्कारांतर्गत राष्ट्रीय पातळीवर 2.11 लाख आणि क्षेत्रीय स्तरावर 51 हजारांची रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters