गेल्या काही दिवसांपासून राज्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे असताना आता यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. आपला ऊस घालवण्यासाठी सध्या शेतकरी धडपड करत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. तसेच ऊस तोडण्यासाठी ऊसतोड मजुरांकडून पैशाची मागणी देखील केली जात आहे. तसेच मजुरांना मटण, दारू देण्याची मागणी देखील केली जात आहे.
असे असताना आता करमाळा येथील कमला भवानी साखर कारखान्याने एक निर्णय घेतला आहे. एक एप्रिल 2022 पासून कारखान्याकडे ऊस तोडणी करणाऱ्या ट्रक/ट्रॅक्टर टोळ्या, टायर बैलगाडीवर ट्रॅक्टर गाडी मजूरांना रुपये 50 प्रति टन इतकी वाढीव रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक चेअरमन विक्रम सिंह शिंदे यांनी दिली. यामुळे शेतकऱ्यांची लूट कमी होणार आहे.
ऊस तोडणी मजुरांकडून शेतकर्यांची अडवणूक होत असल्याचे देखील निदर्शनास येत आहे. पर्याय नसल्याने शेतकरी देखील वाढीव रक्कम देण्यास तयार होत आहेत. यामुळे अनेकदा ऊस उत्पादन तोट्यात जात आहे. सध्या परिस्थितीत ऊस जळीत करून तोडण्याचे प्रमाण वाढले असून कारखान्याने सातत्याने सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेतले असून निरनिराळ्या मार्गांनी शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका पार पाडली आहे.
यामुळे ऊस तोडणी मजुरांना प्रति टन 50 रुपये इतकी वाढीव तोडणी रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती चेअरमन विक्रमसिंह शिंदे यांनी दिली. साखर आयुक्तांनी कारखाने हे मे अखेरपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सगळ्याचे गाळप होईल, अशी माहिती सहकारमंत्र्यांनी देखील दिली आहे. यामुळे आता तरी सगळ्याचे ऊस तोडले जाणार का? हे लवकरच समजेल.
महत्वाच्या बातम्या;
मोफत रेशन! 6 महिन्यांसाठी मोफत रेशनची घोषणा, मोबाईल OTP वरून मिळवा रेशन..
लिंबाला सोन्यासारखा भाव, हिंगोलीतील शेतकरी लखपती..
आता शेतकऱ्यांना मिळणार अनुदान स्वरूपात डिझेल? मशागत महागल्याने चर्चा सुरु..
Share your comments