1. बातम्या

ऊस उत्पादकांनावर संकटांची मालिका! एका बाजूला मजुरांकडून शेतकऱ्यांची लुट तर दुसऱ्या बाजूस ट्रॅक्टर ड्रायव्हची एन्ट्री फी

राज्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र आहे आणि त्यात पश्चिम महाराष्ट्र म्हणजे उसाचा महत्वाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. मात्र यंदा ऊस उत्पादक अडचणीत आले आहेत जे की कारखान्याला ऊस १२ ते १४ महिन्याच्या आत घालवावा लागतो पण यंदा १७ ते १८ महिने झाले तरी अद्याप ऊस कारखान्यात पोहचला नाही. उसाला अजून तोडच आली नाही त्यात कारखान्याचे सभासद असूनही वेळेवर तोड येत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला उसाला तोड तर आली आहे पण कामगार पैशाची मागणी करत आहेत तर ट्रॅक्टर आणि ड्रायव्हर ला प्रत्येक खेपेला एन्ट्री द्यावी लागत आहे त्यामुळे ऊस उत्पादकांना मोठा फटका बसत आहे.

किरण भेकणे
किरण भेकणे
sugarcane

एकरी तीन ते पाच हजारांचा 'दक्षिणा' :-

१५ ऑक्टोबरपासून राज्यातील कारखाने सुरू झाले पण यंदा पावसाळा लांबल्यामुळे अनेक भागातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून राहिले तर काही भागातील  ऊस  पडला  त्यामुळे नुकसान पाहायला मिळाले. नंतर उसाला तोड च आली नाही जे की आजच्या स्थितीला १७-१८ महिने झाले तरी अजून तोड नाही त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहेत तर  दुसऱ्या बाजूला ऊसतोडणी सुरू आहे पण कामगारांना पैसे द्यावे लागत आहेत.एका बाजूला कारखान्यात ऊस जायला विलंब झालेला आहे तर दुसऱ्या बाजूस उसाच्या वजणात घट झाली आहे तर उसाला तोड आलेले कामगार पैसे उकळत आहेत. प्रति एकर तीन ते चार हजार रुपये कामगार शेतकऱ्यानं दक्षिणा मागत आहेत. एवढेच नाही तर त्यांना चिकन, मटण तसेच मच्छी सुद्धा द्यावी लागत आहे. साखर आयुक्तकडून सांगण्यात आले आहे की ऊस तोडणीसाठी कोणीही पैसे देऊ नका तसेच जे पैसे मागणी त्यांची तक्रार करावी तरी सुद्धा कामगार पैसे मागत आहेत.

ड्रायव्हरला एन्ट्री :-

उसाच्या प्रत्येक खेपेला ट्रॅक्टर ड्रायव्हर तसेच ट्रक ड्रायव्हर ला शेतकऱ्यांना एन्ट्री द्यावी लागत आहे जे की प्रत्येक खेपेला ३००-५०० रुपये द्यावे लागत आहेत त्यामुळे अजूनच ऊस उत्पादकांना आर्थिक फटका बसत आहे. जर १० खेपा असतील तर ड्रायव्हर ला १० हजार रुपये द्यावे लागत आहे.

रस्त्यांसाठी, फसलेले ट्र्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी खर्च :-

पाऊसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले होते जे की मोठ्या वाहनांसाठी रस्त्याची डागडुजी करावी लागली होती. रस्त्यावरील खड्डे भुजवण्यासाठी खर्च करावा लागत आहे. रस्ते नीट नसल्याने उसाची वाहने बाहेर काढण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत त्यासाठी दुसरा ट्रॅक्टर तसेच जेसीबी बोलवावा लागत आहे. त्यासाठी अजून एक दोन हजार रुपये द्यावे लागत आहेत.

उसाला लागले तुरे(म्हाताऱ्या) :-

अनेक ठिकाणी उसाला तुरे आले आहेत ज्यास म्हाताऱ्या असेही म्हणतात. उसाचे वय झाले की तुरे येतात तर आतून तो पोकळ होण्यास सुरुवात होते जे की यामुळे वजनात घट ही होते आणि याचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. ज्या ठिकाणी कारखानदारी आहे त्या क्षेत्रातील ऊस न काढता दुसऱ्या भागातील ऊस काढणी होत असल्याने ऊस क्षेत्र तसेच राहिले आहे असे सांगितले जात आहे.

English Summary: A series of crises on sugarcane growers! Robbery of farmers by laborers on one side and entry fee of tractor drive on the other side Published on: 16 February 2022, 09:17 IST

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters