सध्या सर्वसामान्य लोकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. वीजेच्या इंधन समायोजन शुल्काच्या दरात वाढ करण्यास विद्युत नियामक आयोगाने परवानगी दिली आहे. त्यामुळे दरवाढ आता अटळ आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महावितरण वीज दर वाढीसाठी कंपनीच्या आर्थिक तोट्याचे कारण देत आहे. मात्र या नावावर महावितरण आधीच ग्राहकांकडून इंधन समायोजन शुल्क आकारात आहे. दरम्यान, काल झालेल्या बैठकीत विद्युत नियामक आयोगाने महावितरणला वीज दर वाढीचा प्रस्ताव देण्याचे निर्देश दिले आहे.
महावितरणला कृषी क्षेत्रातून सर्वाधिक तब्बल 45 हजार 700 कोटी येणे बाकी आहे. यामुळे हा आकडा खूपच मोठा आहे. यामुळे महावितरण आर्थिक तोट्यात आहे. यामुळे शिंदे सरकार पुन्हा एकदा सर्वसामान्य ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक देणार आहे.
गहू उत्पादक राज्यात गव्हाचा तुटवडा, किंमतीत 5 टक्क्यांची वाढ..
दरम्यान, लवकरच दरवाढ होणार हे जवळपास निश्चित आहे. वीज खरेदी खर्चातील वाढीपोटी महावितरणने 1500 कोटी रुपये राखीव ठेवले होते. तो निधी 2021 मध्येच संपला आहे. यामुळे आता निधीची गरज महावितरणला आहे.
50 हजारांच्या प्रोत्साहन अनुदानाची ऑनलाईन यादी जाहीर, शेतकऱ्यांनो तुमचं नाव करा चेक..
महावितरणने 1 एप्रिल 2022 मध्ये खरेदीच्या वाढीपोटी इंधन समायोजन शुल्क आकारण्यास सुरुवात केली. पुढील महिन्यात महावितरण 60 ते 70 पैशांची वाढ करणार आहे. यामुळे याची झळ सर्वसामान्य लोकांना बसणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
आता निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना सुध्दा मिळणार मदत, राज्य सरकारचा मोठा निर्णय
Farmer Income: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत असल्याचे माझ्याकडे पुरावे, केंद्रीय कृषिमंत्र्यांचा दावा
Maharashtra Monsoon: उद्यापासून परतीचा मान्सून माघारी फिरणार, शेतीच्या कामांना येणार वेग..
Share your comments