ऐन दिवाळीत सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसत असल्याचे दिसत आहे. भाजीपाल्याची आवक घटल्याने त्यांच्या किंमती (markets) गगनाला भिडल्या आहेत. घाटकोपर, अंधेरी, खार, माटुंगा आणि बोरिवली भागात प्रतिकिलो टोमॅटोची (tomato) किंमत तब्बल 60 ते 80 रुपये झाली आहे.
पालक याआधी 10 ते 15 रुपये किलोने मिळत होते. आज त्यांची किंमत 50 ते 60 रुपये किलो झाली आहे. भेंडी आणि पडवळ 120 रुपये किलो झाली आहे. एक किलो गवार 160 रुपयांना विकली जात आहेत. तर फुलकोबीची किंमत घाऊक बाजारात 500 रुपये किलो झाली आहे.
खुशखबर! आता पोस्ट ऑफिसच्या गुंतवणूकदारांना मिळणार 'ही' महत्वाची सुविधा
अंधेरीतील लोखंडवाला भागात मंगळवारी एक किलो टोमॅटोची (tomato) किंमत 60 रुपये प्रतिकिलो झाली आहे. पालक 50 रुपये किलो, भेंडी 120 रुपये किलो, गावार 160 रुपये किलो झाली आहे. घाटकोपरमध्ये एक किलो टोमॅटोची किंमत 80 रुपये किलो झाली आहे.
वजन आणि पोटाची चरबी कमी करा 'या' महत्वाच्या टिप्सने; जाणून घ्या सविस्तर
माटुंग्यात टोमॅटोची प्रति किलो किंमत ७0 ते 80 रुपये झाली आहे. तर पडवळ 120 रुपये किलो झाली आहे. वांगे 80 रुपये तर फरसबी प्रति किलो किंमत 120 रुपये झाली आहे.
घाऊक बाजारात फुलकोबी (Cauliflower) पूर्वी 35 ते 40 रुपये किलोंना मिळत होती. आता घाऊक बाजारात फुलकोबीची किंमत 500 रुपयांना विकली जात आहे. कोबी पूर्वी 8 रुपये किलोने मिळत होती आता त्याची किंमत 40 रुपये झाली आहे.16 ते 18 रुपये किलोने मिळणारी कॉलीफ्लॉवर आता 60 रुपये किलोने मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या
सणासुदीनंतर बाजारात खळबळ; 10 ग्रॅम सोन्या-चांदीचा भाव किती बदलला? जाणून घ्या
‘या’ तारखेनंतर राज्यात धो-धो पाऊस कोसळणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
या 'पाच' राशीच्या लोकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; जाणून घ्या संपूर्ण राशीभविष्य
Share your comments