राज्यस्तरीय बँकर्स समिती दर वर्षी बँकांना पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देत असते. त्यानुसार शेतकऱ्यांना 2021-22 च्या खरीप व रब्बी हंगामात 20 हजार 584 कोटींचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
परंतु 31 मार्च पर्यंत 31 जिल्हा बँकांपैकी 10 बँकांनी 80 टक्क्यांपेक्षा कमी कर्ज वाटप केल्याची माहिती राज्य बँकेकडून देण्यात आली. त्यामुळे कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना सोबतच राज्यातील जवळपास सात लाख शेतकऱ्यांना बॅंकांकडून पीककर्ज अध्याप मिळू शकलेली नाही.
नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठीचे भारनियमन थांबवा; नाहीतर रस्त्यावर उतरणार, राजू शेट्टींचा इशारा
या 31 जिल्हा बँकेच्या माध्यमातून शंभर टक्के शेतकऱ्यांना कर्ज वाटप करावे अशी अपेक्षा असते. परंतु बँकांकडून कर्ज घेऊन कर्जमाफीची वाट पाहणारे बरेच शेतकरी आहेत.
महात्मा फुले शेतकरी सन्मान योजना अंतर्गत झालेल्या दोन लाखांवरील कर्ज माफ झालेले व प्रोत्साहनपर अनुदानास पात्र शेतकर्यांना अजूनही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. यामुळेच बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देण्यास आखडता हात घेतला आहे. सन 2021 ते 22 या आर्थिक वर्षासाठी राज्य बँकेने मुंबई, ठाणे आणि वर्धा जिल्हा बँक वगळता 31 जिल्हा बँकांपैकी 28 जिल्हा बँकांना 8892 कोटींचे कर्ज मंजूर केले. 28 बँकांपैकी जवळजवळ बावीस जिल्हा बँकांनी सात हजार कोटींचे कर्ज घेतले.
नक्की वाचा:जनावरांचा चारा महागणार; ज्वारी पेक्षा कडब्याला मागणी
परंतु तरीसुद्धा जळगाव, नागपूर, अमरावती, अकोला, सांगली, ठाणे, औरंगाबाद, उस्मानाबाद, परभणी या जिल्हा बँक यांनी 80 टक्क्यांपेक्षा कमी कर्ज वाटप केल्याची माहिती राज्य बँकेकडील माहितीवरून समोर आली आहे. त्यासोबतच शासनाने शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी देण्यात यावेअसा निर्णय घेतला आहे. परंतु बँकांनी जर त्यांच्या उद्दिष्टानुसार कर्जवाटप केले तर शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे.
Share your comments