एक कोटी ३५ लाख शिधापत्रिका धारकांना ३७ लाख क्विंटल अन्नधान्याचे वाटप

28 July 2020 01:49 PM By: भरत भास्कर जाधव


मुंबई : राज्यातील ५२ हजार ४३५ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत चालू  आहे.  १ जुलै ते २५ जुलैपर्यंत राज्यातील १ कोटी लाख ४८ हजार ६२६ शिधापत्रिका धारकांना ३७ लाख ३ हजार ७९३ क्किंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे.  या लाभार्थ्यांना ५२ हजार ४३५ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो.  राज्यात या योजनेमधून सुमारे १७ लाख ८१ हजार  ३३७  क्विंटल गहू, १३ लाख ७०  हजार  ४६७  क्विंटल तांदूळ, तर  १८  हजार ८२५  क्विंटल साखरेचे  वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात  अडकलेल्या सुमारे ३ लाख १५  हजार २०२ शिधापत्रिका धारकांनी  ते जेथे राहत आहे,  त्याठिकाणी शासनाच्या पोर्टेबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रति महिना ५ किलो (गहू + तांदूळ) मोफत देण्याची योजना आहे.   15 जुलैपासून आतापर्यंत जुलै महिन्यासाठी एकूण २५ लाख  ३४  हजार २३४   रेशनकार्डला मोफत (गहू + तांदूळ) वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील १ कोटी  १०  लाख ३९  हजार  ७८४  लोकसंख्येला ५  लाख  ५१  हजार ९८९ क्विंटल गहू आणि तांदळाचे वाटप झाले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रति महिना  ५  किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे.  या योजनेतून १ कोटी ४० लाख ८० हजार ५०१ रेशनकार्ड धारकांना मोफत तांदूळ वाटप

या रेशनकार्ड वरील ६ कोटी ३६ लाख ५८  हजार  १७१  लोकसंख्येला ३१  लाख  ८२ हजार  ९०९  क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे. राज्य शासनाने कोविड-१९ संकटावरील  उपाययोजनेसाठी ३ कोटी ८ लाख  ४४  हजार ०७६  एपीएल केसरी शिधापत्रिका असलेल्या लाभार्थ्यांना  प्रति व्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू ८ रुपये प्रति किलो व तांदूळ  १२ रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे मे व जून महिन्यासाठी आतापर्यंत १३ लाख ४ हजार ४६ क्विंटल धान्य वाटप केले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रति रेशनकार्ड १ किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची तरतूद आहे. आतापर्यंत या योजनेतून सुमारे ३ लाख ८१ हजार  १९५ क्विंटल डाळीचे एप्रिल ते जून महिन्यासाठी वाटप केले आहे.  आत्मनिर्भर भारत या योजनेचा अन्नधान्य लाभ मे व जून या २ महिन्यांसाठी असून त्या  अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारकांना प्रति व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ दिला जात आहे आतापर्यंत १ लाख ३३ हजार ५१७  क्विंटल मोफत तांदूळ वितरित केला आहे.

foodgrains ration card holders ration ration card अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ Food Civil Supplies and Consumer Protection Minister Chhagan Bhujbal छगन भुजबळ Chhagan Bhujbal प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana
English Summary: Distribution of 37 lakh quintals of foodgrains to 1 crore 35 lakh ration card holders

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.